शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बापानेच केला सात महिन्याच्या चिमुरडीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 15:43 IST

आंधळगाव (ता.शिरूर) येथे मुलगी पोटाची नसल्याचे संशय असल्याने बापानेच  सात महिन्याच्या मुलीचा गळा चिरून तिचा खून करून मृतदेह जवळच्या विहिरीत फेकला असल्याची घटना घडली आहे. तर मुलीच्या बापाने मुलीचे अपहरण झाल्याच बनाव केला होता.

ठळक मुद्दे पोलिसांच्या तपासात मुलीच्या वडिलांच्या बोलण्यात तफावत आढळली.

रांजणगाव सांडस : आंधळगाव (ता.शिरूर) येथे  स्वतः ची मुलगी नसल्याचा संशय असल्याने बापानेच  सात महिन्याच्या मुलीचा गळा चिरून तिचा खून करून मृतदेह जवळच्या विहिरीत फेकला असल्याची घटना घडली आहे , तर मुलीच्या बापाने मुलीचे अपहरण झाल्याचा  बनाव केला होता.अवघ्या पाच तासात शिरूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे व पथकाने या गुन्ह्याचा तपास लावण्यात यश आले आहे.यामुळे याभागात खळबळ उडाली आहे . ही घटना २८ फेब्रुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. कौशल्या भुरा  धुलकर ( वय ७ महिने) असे खून झालेल्या मुलीचे नांव आहे. भूरा शंकर धुलकर (वय २८,सध्या   , मूळ रा .विटनेर , जळगाव ) असे मुलीचा खून करणा-या बापाचे नांव आहे. याबाबत शिरूरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,  कुरळी -आंधळगाव हद्दीत अनिल बोरकर यांच्या शेतात भूरा धुलकर हा ऊसतोड करीत होता. घटनेच्या दिवशी रात्रीपासून परीसरात त्याची सात महिन्याची मुलीला कौशल्याला  कोणीतरी उचलून नेल्याचा बनाव त्याने केला होता . मुलगी सापडत नसल्याने तो मांडवगण पोलिस स्टेशन येथे मुलगी हरवल्याची फिर्याद देण्यासाठी भूरा व त्याची पत्नी गेली होती. त्याचवेळी पोलीस स्टेशन येथे भुरा राहत असलेल्या ठिकणाजवळ असलेल्या विहिरीत मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे माहिती पोलिसांनी मिळाली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर मुलीचा गळा चिरलेला दिसला असल्याने ही खुनाची घटना असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांना संशय आला. त्यामुळे पोलिसांची चक्रे त्यादिशेने फिरली असता मुलीच्या वडिलांच्या बोलण्यात तफावत आढळली. पोलिसांनी मुलीचे वडील भूरा याला पोलीसी खाक्या दाखवतच भुरा धुलकर याने खुनाची कबुली दिली. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर बायको अरुणा ही बरेच दिवस माहेरी होती. ती पुन्हा नांदायला आली त्यानंतर त्यांना कौशल्या ही मुलगी झाली. परंतु , ही मुलगी आपली नाही असा संशय भुऱ्याला होता. यावरून अरुणाबरोबर त्याची भांडणे होत असत. बुधवारी दुपारी अशीच भांडणे झाली होती. त्या रागात रात्री भुरा याने मुलीला झोपडीतून बाहेर नेले व तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. यावेळी अरुणा हिने विरोध कण्याचे प्रयत्न केला असता तुलाही मारून टाकेल अस दम दिला व मृतदेह जवळच्या विहिरीत फेकून दिला असल्याची कबुली आरोपी भूरा धुलकर याने दिली. 

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुर