आलेगाव मलठण रस्त्यासाठी सात कोटी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:10 IST2021-03-23T04:10:20+5:302021-03-23T04:10:20+5:30

आलेगाव - बोरीबेल - मलठण रस्ता व मलठण - राजेगाव - भिगवण स्टेशन रस्त्याची सुधारणा व रुंदीकरण ...

Seven crore fund for Alegaon Malthan road | आलेगाव मलठण रस्त्यासाठी सात कोटी निधी

आलेगाव मलठण रस्त्यासाठी सात कोटी निधी

आलेगाव - बोरीबेल - मलठण रस्ता व मलठण - राजेगाव - भिगवण स्टेशन रस्त्याची सुधारणा व रुंदीकरण या ७ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली आहे.

दौंड तालुक्यातील आलेगाव बोरीबेल मलठण रस्ता प्रजिमा ८१ व मलठण राजेगाव भिगवण स्टेशन रस्ता प्रजिमा – ७९ रस्त्याचे कामा करण्याबाबत आमदार राहुल कुल यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून मागणी केली होती. त्याला निधी देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता झाली नव्हती त्यानंतर आमदार कुल यांनी विधानसभेच्या विविध समित्यांशी पत्रव्यवहार करून व बैठका आयोजित करून सदर रस्त्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची विनंती केली होती त्या वेळी सदर कामाचा समावेश अर्थसंकल्पात करण्याचे अधिवेशन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते.

त्यानुसार सदर रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, तालुक्यातील विकासकामांसाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

Web Title: Seven crore fund for Alegaon Malthan road