आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:05+5:302021-02-05T05:04:05+5:30
आनंद वसंत शिंदे यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्या प्रकरणी शकुंतला भालेकर, अलका ओव्हाळ, कोंडाबाई ...

आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
आनंद वसंत शिंदे यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्या प्रकरणी शकुंतला भालेकर, अलका ओव्हाळ, कोंडाबाई सुरेश गायकवाड, रवींद्र ज्ञानदेव ओव्हाळ, दीपक दिवाकर साळवे, विशाल सुरेश गायकवाड, ज्ञानदेव राजाराम ओव्हाळ (सर्व रा. इंदिरानगर, वारूळवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत फिर्याद शकुंतला वसंत शिंदे (रा. इंदिरानगर, वारूळवाडी) यांनी दिली आहे.
गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद शिंदे यास शकुंतला भालेकर यांनी दि.३० जानेवारी रोजी मारहाण केल्याचे कारणावरून हात-पाय तोडण्याच्या तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याने आनंद शिंदे हे तणावात होते. दि.२३ ला आनंद शिंदे हे नारायणगाव येथील इंदिरानगर येथे ओम शिंदे याचे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होता. तेव्हा त्यास शकुंतला भालेकर यांनी विनाकारण शिवीगाळ केली होती. त्यानंतर वारूळवाडी येथील इंदिरानगर येथे शकुंतला भालेकर ही पुन्हा त्या ठिकाणी आली व आनंद यास शिवीगाळ केली. त्यावेळी आनंद यांनी शकुंतला भालेकर हिला चापट मारल्याने ती खाली पडली आणि तिच्या डोक्याला लागले होते. त्यानंतर शकुंतला भालेकर व अलका ज्ञानदेव ओव्हाळ, कोंडाबाई सुरेश गायकवाड, रवींद्र ज्ञानदेव ओव्हाळ, दीपक दिवाकर साळवे, विशाल सुरेश गायकवाड, ज्ञानदेव राजाराम ओव्हाळ हे वारंवार आनंद शिंदे याचेकडे शकुंतला भालेकर हिला झालेल्या दुखापतीमुळे व तिला मारहाण केलेचे कारणावरून शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होते. या धमकीमुळे आनंद शिंदे दि.३० ला वाजगे आळी येथील राहते घराचे छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सात जणांना अटक करून जुन्नर न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने चौदा दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे हे करीत आहेत.