त्रिसूत्री कार्यक्रमात समस्यांचा निपटारा
By Admin | Updated: January 18, 2016 01:07 IST2016-01-18T01:07:09+5:302016-01-18T01:07:09+5:30
महावितरणच्या सासवड विभागाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील विविध गावांत नुकताच त्रिसूत्री कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकाच दिवसात विजेची ५२० कामे करण्यात आली

त्रिसूत्री कार्यक्रमात समस्यांचा निपटारा
सासवड : महावितरणच्या सासवड विभागाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील विविध गावांत नुकताच त्रिसूत्री कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकाच दिवसात विजेची ५२० कामे करण्यात आली. वीज समस्यांचा जागेवरच निपटारा झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.
नीरा उपविभागात बेलसर येथे ९ रोहित्रांच्या पेट्या दुरुस्त करण्यात आल्या. ७ ठिकाणी किटकॅट, ७ जागी पोल बदलण्यात आले. ७ ठिकाणी सैल गाळे ओढण्यात आले. २ ठिकाणी उच्चदाब वाहिनीस तर ५ ठिकाणी लघुदाब वाहिनीस गार्डिंग करण्यात आले.
२६ नादुरुस्त मीटर बदलण्यात आले. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या १२ ग्राहकांची पडताळणी करण्यात आली. ० ते ३० युनिट वीजवापर असलेल्या ४७ ग्राहकांची, मीटर रीडिंग उपलब्ध नसलेल्या २३ ग्राहकांची तपासणी करण्यात आली.
जेजुरी येथे ३ रोहित्रांच्या पेट्या दुरुस्त करण्यात आल्या. ९ ठिकाणी किटकॅट बदलण्यात आले. सैल गाळे असलेल्या ७ ठिकाणी नवीन पोल बसवण्यात आले. १७ ठिकाणी सैल गाळे ओढण्यात आले.
४ ठिकाणी लघुदाब वाहिनीस गार्डिंग करण्यात आले. ३५ नादुरुस्त मीटर बदलण्यात आले. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ४ ग्राहकांची पडताळणी करण्यात आली. ० ते ३० युनिट वीजवापर असलेल्या २२ ग्राहकांची, मीटर रीडिंग उपलब्ध नसलेल्या ४१ ग्राहकांची तपासणी करण्यात आली. ५ ठिकाणी वीजचोरी व अनधिकृत वीजवापराची प्रकरणे उघडकीस आली.
३२ ग्राहकांकडून १२ हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. ७ गाळ्यांना स्पेसर बसवण्यात आले. ३७ ठिकाणी लघुदाब वाहिनीस जंपरिंग करण्यात आले. ३ रोहित्र दुरुस्त करण्यात आले. तसेच ३ ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली. २५० मीटर तांब्याच्या वीजवाहक तारा बदलण्यात आल्या. २१ ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती करण्यात आली.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या मार्गदशर्नाखाली बारामती ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता केशव सदाकाळे, सासवड विभागाचे कायर्कारी अभियंता मदन शेवाळे, नीरा उपविभागाचे उपकायर्कारी अभियंता बाळासाहेब फासगे व सासवड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरुड यांच्या देखरेखीखाली तांत्रिक कमर्चारी, फोरमन, बिलिंग अशा एकूण ६० कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.