शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उसने पैशांच्या वाद, मित्रालाच दिले पेटवून, उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 10:37 IST

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुरसुंगी गुरुवारी हा प्रकार घडला

पुणे: दोन मित्रांमध्ये उसन्या पैशावरून झालेला वाद टोकाला पोहोचला. त्यातील एकाने दुसऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या दुसऱ्याचा ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुरसुंगी गुरुवारी हा प्रकार घडला. संतोष दादाराव कागदे (वय 51, रा. भैरवनाथ मंदिर समोर आंबेगाव बुद्रुक हवेली पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मनोज मोहन कांदे (वय 28, रा. संकेत विहार फुरसुंगी पुणे) याला अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष आणि मनोज दोघेही मित्र होते. यातील आरोपी मनोज कांदे याने संतोष कागदे याच्याकडून उसने पैसे घेतले होते. या उसने पैशावरून त्या दोघात सातत्याने वाद होत होते. दरम्यान गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते फुरसुंगी तील संकेत विहार येथील एका विहिरीजवळ भेटले. इथे त्यांचा पुन्हा एकदा भांडण झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला 'तुला पेट्रोल टाकून जाळून खल्लास करतो' असे म्हणून त्याच्या अंगावर बाटली मधील पेट्रोल ओतून काडी पेटवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान या घटनेत संतोष कागदे हे गंभीररीत्या भाजले होते. उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्ह्यांमध्ये भादवि 302 अन्वये कलम वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेHadapsarहडपसर