शहरात वारकऱ्यांची मनोभावे सेवा
By Admin | Updated: July 2, 2016 12:47 IST2016-07-01T02:00:37+5:302016-07-02T12:47:27+5:30
सामाजिक संदेश देणारी रांगोळी समर्थ रंगावली या संस्थेच्या कलाकारांनी काढून पालखीमधील वारकरी वैष्णवांचे निगडी येथील भक्तिशक्ती चौकात अनोखे स्वागत केले.

शहरात वारकऱ्यांची मनोभावे सेवा
नेहरुनगर : पाणी वाचवा... झाडे लावा झाडे जगवा... बेटी बचाव बेटी पढाव... रक्तदान करा... नेत्रदान करा... प्लॅस्टिकमुक्त वारी... स्वच्छ भारत....सुंदर भारत....असा सामाजिक संदेश देणारी रांगोळी समर्थ रंगावली या संस्थेच्या कलाकारांनी काढून पालखीमधील वारकरी वैष्णवांचे निगडी येथील भक्तिशक्ती चौकात अनोखे स्वागत केले.
निगडी येथील भक्तिशक्ती चौकात समर्थ रंगावली या संस्थेच्या संतोष अढागळे, अक्षय घोळवे, हेमंत जगताप, ज्योती कोल्हे या कलाकारांनी पाणी वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव, रक्तदान करा, नेत्रदान करा, प्लॅस्टिकमुक्त वारी, स्वच्छ भारत, सुंदर भारत असा सामाजिक संदेश देणारी रांगोळी रेखाटून सामाजिक संदेश देऊन श्री जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांच्या पालखीचे स्वागत केले. अनेक नागरिक, तरुण-तरुणी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात छायाचित्र टिपत होते.
बोपोडीत दर्शनासाठी झुंबड
खडकी : बोपोडी पोलीस चौकी येथे संत तुकाराममहाराज पालखीने दुपारचा विसावा घेतला. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विविध सार्वजनिक गणेश मंडळ, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षाच्या स्वागत कक्षाने बोपोडीतील सर्व रस्ते व्यापून गेले होते. किर्लोस्कर आॅइल इंजिन्स कंपनीतर्फे फराळवाटप केले गेले. फराळाचे पदार्थ, चहा, नाश्ता, लाडू, बिस्कीट, तसेच अन्नदानवाटप केले गेले. सिग्नल चौक फ्लेक्सने भरून गेला होता. हॅरिस पुलाजवळ उभारण्यात आलेली विठ्ठलाची कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्यांचे अनावरण देहू संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते झाले.
प्रथमोपचार पेटीचे वाटप
पुणे रुग्ण सेवा समितीतर्फे दिंडीप्रमुखांना औषधाचा संच भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा यांनी केले. एकूण २५० संचांचे वाटप केले गेले. उर्वरित संच सासवड येथे वाटले जाणार आहेत. विशाल जाधव, राजू बहिरट, रणजित गायकवाड, विठ्ठल आरुडे, इंद्रजित भालेराव, छोटू पिल्ले, प्रशांत टेके, शैलेंद्र पवार, राजू पिल्ले यांनी आयोजन केले.
कॉँग्रेसतर्फे गांधी टोपीचे वाटप
कॉँग्रेसतर्फे अभय छाजेड, चंद्रकांत छाजेड यांच्या हस्ते गुडदाणी, पाण्याचा बाटल्या, शेंगदाणा चिक्की आणि औषध संचाचे वाटप केले गेले. या वेळी नगरसेवक दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक आनंद छाजेड, शैलेजा खेडेकर, राजेंद्र भुतडा, अमर गायकवाड, प्रदीप खेडेकर, सुंदरा ओव्हाळ, ज्योती परदेशी, कांता ढोणे, कमल गायकवाड, विमल खांडेकर उपस्थित होते.
वारकऱ्यांना पाण्याची टाकी
पिंपरी : पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना इनरव्हिल क्लब पिंपरी यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची टाकी भेट देण्यात आली. पिंपरी स्टार क्लबच्या नियोजित अध्यक्षा शिल्पा गर्ग, सचिन आगरवाल यांच्या हस्ते वारकऱ्यांना पाण्याची टाकी देण्यात आली. या वेळी क्लबच्या अध्यक्षा अनुराधा राव, सचिव सिल्वी डिसूजा, प्रीती पाटील, अर्चना राणे, एन. पी सुवा आदी उपस्थित होते.
वारकऱ्यांना महाप्रसादवाटप
खडकी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे महापालिका यांच्या पाणीपुरवठा विभागाच्या खडकी केंद्रातर्फे संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला. पालखीतील दिंडी क्रमांक २३ नवनाथ सांप्रदायिक दिंडीसह सुमारे ५०० जणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गेल्या २५ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अंकुश गाडे, अरुण नरसाळे, कैलास भोकाडे, जैनुद्दिन शेख, सुनील गोळे आदी कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
तुळशी रोपांचे वाटप
खडकी : कॉँग्रेसतर्फे येथील आॅल सेंट्स स्कूल चौकात वारकऱ्यांना तुळशीचे रोप, औषधाची प्रथमोचार पेटी, लाडू आणि पाण्याच्या बाटलीचे वाटप केले गेले. पक्षाचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते वाटप झाले. या वेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे, नगरसेवक मनीष आनंद, कमलेश चासकर, दुर्याेधन भापकर, युवक कॉँग्रेसचे माजी विभागाध्यक्ष संतोष चव्हाण, विभागाध्यक्ष गणेश पोलकमवार, दादा कचरे आदी उपस्थित होते. कॉँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सेल्वराज अॅन्थोनी यांनी संयोजन केले.
वारकऱ्यांना घोंगट्यावाटप
भोसरी : येथील सूरजभाऊ लांडगे यूथ फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना प्लॅस्टिक कापडाची घोंगटे व लाडूवाटप करण्यात आले या वेळी पोपटराव फुगे, पिलाजी शिंदे, हिरामण लांडगे, शेखर लांडगे व फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. ८०० घोंगट्यांचे व ७०० पाकीट लाडूंचे वाटप करण्यात आले.
विठ्ठलाची २५ फुटी प्रतिकृती
पिंपळे गुरव : दापोडीतील कै. सुभद्राबाई नारायण एपे्र यांच्या वतीने विठ्ठलाची २५ फुटी प्रतिकृती उभारण्यात आली होती. दापोडीतील इश्ताक शेख युवा मंच यांच्या वतीने भाविकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. या वेळी महम्मद युसूफ शेख, इश्ताक शेख, आकिलेश शेख, जुबेर गाजी उपस्थित होते.
रोहितराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांना मसाज सेवा व औषधोपचार सेवा देण्यात आली. या वेळी सोन्या काटे,
लाकेश काटे, आतिश परदेशी, गणेश काटे उपस्थित होते. डॉ. संदीप बांगर यांच्या वतीने वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. (वार्ताहर)