‘सीरम’च्या लसीने मेंदूची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:51+5:302020-12-02T04:07:51+5:30
पुणे : चाचणीदरम्यान कोविशिल्ड लस दिलेल्या चेन्नई येथील एका स्वयंसेवकाने लसीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर आरोप केले आहेत. लस दिल्यानंतर नुरॉलॉजीकल ...

‘सीरम’च्या लसीने मेंदूची समस्या
पुणे : चाचणीदरम्यान कोविशिल्ड लस दिलेल्या चेन्नई येथील एका स्वयंसेवकाने लसीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर आरोप केले आहेत. लस दिल्यानंतर नुरॉलॉजीकल समस्या निर्माण झाल्याची तक्रार करत सीरम इन्स्टिट्यूटसह ऑक्सफर्ड विद्यापीठ व अस्ट्र्झेनेका कंपनीला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. तसेच चाचण्या थांबविण्याची मागणीही केली आहे. सीरमने मात्र हे आरोप फेटाळून लावत स्वयंसेवकाविरुद्ध १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान भरपाई मागण्याचा इशारा दिला आहे.
भारतात सिरम मार्फत कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. याअंतर्गत चेन्नई येथील एका 40 वर्षीय व्यक्तीला 1 ऑक्टोबर रोजी पहिला डोस देण्यात आला होता. लसीकरणानंतर त्याला मेंदूचा गंभीर आजार झाल्याचा आरोप या व्यक्तीने नोटिसमध्ये केला आहे. लसीच्या डोसामुळेच ही समस्या उद्भवल्याचे वैदयकीय तपासणीमध्ये स्पष्ट झाल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे. तसेच लसीच्या चाचण्या, उत्पादन व वितरण थांबविण्याची मागणी ही या व्यक्तीने केली आहे.
दरम्यान , सीरमने हे आरोप फेटाळून लावले आहेत. स्वयंसेवकांची आरोग्य स्थिती व चाचणीचा संबंध नाही. ते चुकीच्या पद्धतीने आपल्यातील समस्यांचा दोष चाचणीला देत आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण चुकीच्या पद्धतीने संस्थेची बदनामी करत आहेत. यासाठी 100 कोटीपेक्षा अधिक नुकसान भरपाईचा दावा संस्थेकडून केला जाऊ शकतो, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.
-----