शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सिरम ‘कोव्होव्हॅक्स’च्या चाचण्या एप्रिलमध्ये, २० कोटी डोसचे नियोजन; जूनमध्ये टोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 06:47 IST

“लसीची परिणामकारकता प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात या लसीच्या चाचण्या सुरू करण्यासंदर्भात अर्ज करण्यात आला आहे,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी नुकतीच ट्विट करून दिली. जून २०२१ पर्यंत ‘कोव्होव्हॅक्स’च्या प्रत्यक्ष वापराला सुरुवात होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुणे: अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्स आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेली ‘कोव्होव्हॅक्स’ ही लस ऑगस्ट महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यात या लसीच्या मानवी चाचण्यांना भारतात सुरुवात होणार आहे. मानवी चाचण्या सुरू असतानाच लसीचे उत्पादनही सुरू केले जाणार आहे. परवानगी मिळाल्यावर तत्काळ वितरणाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने सिरम इन्स्टिट्यूटने तयारी केली आहे. ‘कोव्हॅक्स’ देशांना पुरवाव्या लागणाऱ्या २० कोटी डोसचे अद्याप नियोजन सुरू असल्याचे समजते. (Serum ‘Kovovax’ tests in April, 200 million doses planned)“लसीची परिणामकारकता प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात या लसीच्या चाचण्या सुरू करण्यासंदर्भात अर्ज करण्यात आला आहे,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी नुकतीच ट्विट करून दिली. जून २०२१ पर्यंत ‘कोव्होव्हॅक्स’च्या प्रत्यक्ष वापराला सुरुवात होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.नोव्हाव्हॅक्स या अमेरिकी कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबतचे संशोधन व उत्पादन करण्याबाबत त्या कंपनीने सिरम इन्स्टिट्यूटशी ऑगस्ट २०२० मध्ये करार केला. नोव्हाव्हॅक्स कंपनीच्या लसीचे भारतात उत्पादन करण्याचा विशेष हक्क या कराराद्वारे सिरम इन्स्टिट्यूटला प्राप्त झाला. उच्च मध्यम किंवा उच्च उत्पन्न असलेले देश वगळता अन्य देशांसाठी कोरोना साथीच्या काळात सिरम इन्स्टिट्यूटला नोव्हाव्हॅक्स लसीचे उत्पादन करण्याचा हक्क या कराराद्वारे मिळाला. सर्व परवानग्या मिळून चाचण्या सुरळीत पार पडल्यास कोव्होव्हॅक्स ही भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळणारी आणखी एक महत्त्वाची लस असेल. 

८९ टक्के परिणामकारक- ब्रिटनमध्ये पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये कोव्होव्हॅक्स लसींची परिणामकारकता ८९.३ टक्के इतकी असल्याचे सिद्ध झाले आहे. - यामध्ये १८ ते ८४ या वयोगटातील १५ हजार स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली. - कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवरही ही लस प्रभावी असल्याचे विविध संशोधनातून सिद्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेmedicineऔषधं