शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

'सिरम'मधून दिलासादायक बातमी : 'कोविशिल्ड' लस सुरक्षित; आगीत कुठलीही जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 17:07 IST

मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये दुपारी भीषण आग लागली आहे.

पुणे : मांजरी येथील सिरम इन्स्टिट्युटमधील एका इमारतीला गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.आणि थोड्याच दिवसांपूर्वी कोविशिल्ड लसचे वितरणकरून एकप्रकारे दिलासा मिळालेल्या प्रत्येकाच्या मनात या आगीमुळे कोविशिल्ड लस सुरक्षित आहे का, आगीचे लस उत्पादनावर काय परिणाम होईल यांसह अनेक प्रश्न उपस्थित झाले त्याचवेळी सिरममधून सर्वांना दिलासा देणारी बातमीसमोर आली आहे. सध्या आगीने जरी रौद्ररूप धारण केले असले तरी कोविशिल्ड लस सुरक्षित आहे. तसेच कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सिरमचे सीईओ अदर पूनावाला याांनी स्पष्ट केले आहे. 

आज दुपारी मांजरी येथील सिरम कंपनीच्या एका इमारतीला भीषण आग लागली.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  पण आग इतकी भीषण आहे की अग्निशामक दलाच्या जवानांना  आत्तापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. तसेच धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात असून  आग वेगाने पसरत आहे.  मांजरीकडील बाजूला असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. 

सिरम इन्स्टिट्युट येथे सध्या कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन सुरु आहे. भारतासह शेजारील राष्ट्रांना या लसीचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र आग लागलेल्या इमारतीत कोविशिल्ड चे उत्पादन होत नसून तिथे बीसीजी लस निर्मितीची प्रक्रिया सुरू असते. सध्या या इमारतीत फर्निचर व इलेक्ट्रिक काम सुरू होते अशी माहिती समोर आली आहे. तसेच कोविशिल्ड लस ही पूर्णपणे सुरक्षित असून तिला कुठलाही धोका नसल्याचे सिरमकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. 

केंद्रीय पथकाने घेतली आगीची माहिती..

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या भीषण आगीची माहिती मिळताच केंद्रीय तपास पथकाने दखल घेत सिरममध्ये फोन करत कोविशिल्ड लस व तिच्या सुरक्षिततेविषयी विचारपूस केली आहे.सिरम इन्स्टिट्यूट मध्ये लागलेल्या आगीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली आहे. तसेच आगी संदर्भातला अहवाल केन्द्रिय पथकाला द्यावा लागणार आहे. घटनास्थळी एक एनडीआरएफची एक तुकडी रवाना करण्यात आली आहे.

आग विझवणे आणि हानी टाळणे याला प्राधान्य: उपमुख्यमंत्री अजित पवारपुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात झाल्या आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य....आगीत कोणीही जखमी नाही...: अदर पुनावालासिरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला लागलेल्या आगीत कोणतीही जिवित हानी झालेली नाही. कोणीही जखमी झाले नाही़ मात्र, इमारतीतील काही मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती अदर पुनावाला यांनी टिष्ट्वट करुन दिली आहे. इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढणे याला आम्ही महत्व देत आहोत, असे त्यांनी कळविले आहे.

टॅग्स :PuneपुणेManjriमांजरीCorona vaccineकोरोनाची लस