शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भेकराच्या पिलांची आईपासून ताटातूट; शेतकर्‍याने दिले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 14:36 IST

जन्मदात्या आईची जंगलातून जेथून ताटातूट झाली तेथे त्या भेकराच्या पिलांना दिवसभर ठेवून देखरेख केली. मात्र त्यांची आई आली नाही. अखेर ती कोणाची भक्ष्य ठरू नयेत, म्हणून त्यांना संगोपनासाठी कात्रज प्राणिसंग्रालयात दाखल करण्यात आले. 

ठळक मुद्देसह्याद्रीच्या अतिदुर्गम पर्वतरांगेतील जंगलामध्ये भेकर नावाचा प्राणी आढळतो.वेल्हे तालुका अतिदुर्गम, जैवविविधता व विविध वन्यजीवांनी समृद्ध असा परिसर

वेल्हे : जन्मदात्या आईची जंगलातून जेथून ताटातूट झाली तेथे त्या भेकराच्या पिलांना दिवसभर ठेवून देखरेख केली. मात्र त्यांची आई आली नाही. अखेर ती कोणाची भक्ष्य ठरू नयेत, म्हणून त्यांना संगोपनासाठी कात्रज प्राणिसंग्रालयात दाखल करण्यात आले. वेल्हे तालुका हा अतिदुर्गम असून जैवविविधता व विविध वन्यजीवांनी समृद्ध असा हा परिसर आहे. सह्याद्रीच्या अतिदुर्गम पर्वतरांगेतील जंगलामध्ये भेकर नावाचा प्राणी आढळतो. कोंढावळे बुद्रुक येथील शेतकरी विजय थोपटे शेतामध्ये मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता भेकर जातीच्या प्राण्याची दोन पिले त्यांना मेंढ्यांच्या कळपात दिसली आणि त्यांना आश्चर्य वाटले. मात्र ती भाबडी पिलं दिवसभर त्या मेंढ्यांच्या कळपात चरत राहिली, मात्र त्यांची आई काही आली नाही. लळा लागल्याने कळपासोबत ती थोपटे यांच्या घरीदेखील आली. 

यामधील एका भेकराची प्रकृती खालावल्याचे जाणवल्याने संध्याकाळी घरी येताच थोपटे यांनी हा प्रकार वनविभागाचे कर्मचारी बी. व्ही. तांबे यांना कळविला. वनविभागाचे वनरक्षक तांबे, गोकुळ बंगाल आणि जी. पी. बागडे यांनी प्रथमोपचार केले. जन्मदात्या आईची भेट घडवून देण्यासाठी त्या पिलांना घेऊन जेथून पिले कळपात सहभागी झाली त्या ठिकाणी ठेवले. रात्री उशिरापर्यंत पडत्या पावसात ते कर्मचारी व विजय थोपटे देखरेख करीत थांबले. या पिलांना त्यांची आई व नैसर्गिक जीवन मिळावे, या हेतूने त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांची आई तेथे आली नाही. अखेर त्या पिलांना कात्रज प्राणिसंग्रहालयात देण्यात आले. 

भेकराची पिले कळपासोबत दिवसभर फिरली. मी त्यांच्यावर लक्ष ठेवले. दुर्लक्ष केले असते तर कुत्री, मांजर यांच्याकडून त्याच्या जीवितास धोका होता. शिवाय मानवी वस्तीजवळ आल्याने आयती शिकार होऊन निष्पाप पिलांचा नाहक बळी गेला असता.- विजय थोपटे, शेतकरी, कोंढावळे बुद्रुक, ता. वेल्हे.

वेल्हे तालुक्यात जंगलामधून विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, वनस्पती अस्तित्वात आहेत. या प्रजातींचे संवर्धन करणे ही माणसाची जबाबदारी आहे. भेकर प्राणी आढळल्यास त्यांची शिकार न करता वनविभागास कळवावे व प्राण्यांना जीवदान द्यावे.   - बी. व्ही. तांबे, वनरक्षक वेल्हे तालुका. 

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे