शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

सह्याद्री रेल्वे नावाने स्वतंत्र झोन व्हावा, रेल्वे यात्री संघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 01:01 IST

मुंबईतील एकूणच रहदारी पाहता आणि प्रवासी संख्या प्रचंड असल्याने योग्य तो न्याय निधीरूपाने मुंबई रेल्वे विभागाला मिळत नाही.

पुणे - मुंबईतील एकूणच रहदारी पाहता आणि प्रवासी संख्या प्रचंड असल्याने योग्य तो न्याय निधीरूपाने मुंबई रेल्वे विभागाला मिळत नाही. त्यामुळे तेथील अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. मुंबईकरिता वेगळा तसेच उर्वरित राज्यासाठी सह्याद्री रेल्वे (एसएचआर) नावाने स्वतंत्र झोन करण्यात यावा, अशी मागणी रेल यात्री संघाच्या वतीने करण्यात आली. संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी ही माहिती दिली.नांदेड, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ आणि कोकण विभाग एसएचआरमध्ये समाविष्ट केल्यास रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील असे संघाने म्हटले आहे. अद्यापदेखील इंग्रजांच्या कार्यपद्धतीनुसारच रेल्वेचे कामकाज सुरू असून त्यात कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे. या धर्तीवर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्यालय पुण्यात स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. राज्यातील अनेक नवीन रेल्वे मार्गांना मंजुरी मिळाली असून, त्यांच्या सर्वेक्षणाचे काम संथगतीने सुरु आहे. अनेक मार्गावरील भूसंपादन होणे बाकी आहे. आर्थिक तरतूद असूनदेखील लातूर रोड, अहमदपूर, लोहा, नांदेड रेल्वे मार्गाचे काम संथ गतीने सुरु आहे. तसेच उदगीर बोधन, लातूर, गुलबर्गा, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, जळगाव, जालना आदी मार्गांचे कामे देखील बंद स्थितीत आहे. याशिवाय अनेक लुपलाईन मंजूर असतानादेखील त्यांचे काम होत नाही. याविषयी चौकशीची मागणीदेखील संघाने केली आहे.पुणे-नाशिक मार्ग, पुणे-लोणावळा तिसरी व चौथी मार्गिका, पुणे-नाशिक व पुणे-दौंड मार्गावर लोकल सेवा, पुणे-नगरमार्गाचे विस्तारीकरण आणि अहमदनगर-पुणे इंटरसिटीची जोरदार मागणी असून दौंड ते अहमदनगर कॉर्ड लाईनचे कामे रेंगाळली आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी देखील लोकलची सेवा सुरू नाही.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेPuneपुणे