शिक्षण मंडळाने सादर केले अर्धवट अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 03:17 IST2015-12-30T03:17:13+5:302015-12-30T03:17:13+5:30

शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी मंगळवारी महापालिकेची विशेष सभा बोलाविण्यात आली होती; मात्र

Separate budget presented by the Education Board | शिक्षण मंडळाने सादर केले अर्धवट अंदाजपत्रक

शिक्षण मंडळाने सादर केले अर्धवट अंदाजपत्रक

पुणे : शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी
देण्यासाठी मंगळवारी महापालिकेची विशेष सभा बोलाविण्यात आली होती; मात्र मुख्यसभेसमोर अधर्वट कागदपत्रे सादर करण्यात आल्याने मुख्यसभा तहकूब करण्याची नामुष्की ओढावली.
स्थायी समितीने शिक्षण मंडळाच्या मागील वर्षीच्या तुलनेत ५५ कोटी रुपयांनी वाढीव असलेल्या ३४१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे. या अंदाजपत्रकाला ३१ डिसेंबरच्या आत मंजुरी मिळणे आवश्यक असल्याने मंगळवारी याकरिता विशेष सभा आयोजित करण्यात आली.
सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे सभासद सुधीर जानजोत यांनी सभा चालविण्यासाठी सभागृहात पुरेशी गणसंख्या उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बराच वेळ सभागृहाचे कामकाज खोळंबून राहिले. त्यानंतर उशिराने काही सभासद आल्यानंतर सभेचे कामकाज झाले.

जमेची बाजूच नाही
शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक सादर करताना जमा बाजूच दाखविली नसल्याचे मनसेचे सभासद बाळा शेडगे यांनी सांगितले. त्यानंतर शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहिफळे त्याबाबतची माहिती देत असताना मुख्यसभेला स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाची कागदपत्रेच देण्यात आली नसल्याचे निर्दशनास आले. कागदपत्रे जोडायचे चुकून राहिले असल्याची कबुली दहिफळे यांनी दिली. यावर काँग्रेसच्या सुनंदा गडाळे, कमल व्यवहारे यांनी जोरदार आक्षेप घेतला. अंदाजपत्रकाची संपूर्ण कागदपत्रे सादर करा त्यानंतरच यावर चर्चा करू, अशी भूमिका सभासदांनी घेतली. अखेर सभागृहनेते बंडू केमसे यांनी ३१ डिसेंबरपर्यंत मुख्यसभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली.

Web Title: Separate budget presented by the Education Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.