शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘कामावर घेतल्याचा शब्द द्या, नाहीतर इथून उडी मारेल..’; पुणे महापालिकेत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 14:56 IST

महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या स्मार्ट सेविकांना अचानक कामावरून कमी केल्याने त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी मंगळवारी महापालिकेचा टेरेस गाठून त्यावर आंदोलन केले.

ठळक मुद्देरूपाली पाटील, माजी नगरसेविका युंगधरा चाकणकर यांनी मंगळवारी केले आंदोलन स्मार्ट या संस्थेत एकूण २३० जण असून त्यात २०० महिला व ३० जण पुरूष

पुणे : महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या स्मार्ट सेविकांना अचानक कामावरून कमी केल्याने त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी मंगळवारी महापालिकेचा टेरेस गाठून त्यावर आंदोलन केले. कामावर घेतल्याचा शब्द द्या, नाहीतर इथून खाली उडी मारेल या त्यांच्या इशाऱ्याने महापालिकेत भर दुपारी खळबळ उडाली.गेले अनेक दिवस रूपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेला महिनाभर या स्मार्ट सेविका महापालिकेत चकरा मारत आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. सर्व पदाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांना फक्त आश्वासनेच मिळत आहेत. मात्र प्रशासन काहीच हालचाल करायला तयार नाही. सलग १५ वर्षे करत असलेले काम असे अचानक गेल्यानंतर या सर्व महिला हवालदील झाल्या आहेत. त्यामुळे रूपाली पाटील, माजी नगरसेविका युंगधरा चाकणकर यांनी मंगळवारी दुपारी महापालिका मुख्य इमारतीच्या टेरेसवर जाऊन आंदोलन सुरू केले.आपत्ती निवारण कक्षाच्या समोर महापालिकेचा हा टेरेस आहे. त्यावर चढून त्यांनी घोषणा देण्यास सुरूवात केली. थोड्याच वेळात महापालिकेचे अधिकारी तिथे आले. त्यांनी पाटील व चाकणकर यांना खाली येण्याची विनंती केली. मात्र प्रशासन प्रमुख आल्याशिवाय येणार नाही असे त्यांनी सांगितले. अखेरीस आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त शीतल ऊगले-तेली यांनी त्यांना २५ जानेवारीपर्यंत यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आंदोलन थांबवले व त्या खाली आल्या. अच्छे दिन चे आश्वासन देत निवडून आलेल्या एकाही पदाधिकाऱ्याला या बेरोजगार स्मार्ट महिलांबरोबर चर्चा करण्याची इच्छा झाली नाही याबद्धल पाटील यांनी खंत व्यक्त केली. 

स्मार्ट या संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने या सेविकांना कामावर घेतले होते. एकूण २३० जण असून त्यात २०० महिला व ३० जण पुरूष आहेत. महापालिकेत संगणकाद्वारे काम सुरू झाले त्यावेळी संगणक आॅपरेटर तसेच अन्य कामांसाठी त्यांना मानधन तत्त्वावर घेण्यात आले होते. हे काम करत असल्यामुळे महापालिकेचे कायम कर्मचारी कामच करत नव्हते असे प्रशासनाला आढल्यामुळे या सर्व कर्मचाºयांना कामावरून कमी करण्यात आले आहे. 

टॅग्स :MNSमनसेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे