शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अनुवादक विरुपाक्ष कुलकर्णी यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 21:28 IST

चार दिवसांपूर्वीच ते काश्मीरहुन परतले होते.

पुणे : मराठीतील अभिजात साहित्यकृती अनुवादाद्वारे कन्नड भाषिकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ अनुवादक विरुपाक्ष कुलकर्णी (वय ८१) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी ज्येष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी आहेत. चार दिवसांपूर्वीच ते काश्मीर येथून पुण्यात परतले होते. मात्र त्यांना कोरोनाचे निदान झाले. घरातच विलगीकरणात ते राहत होते.मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

विरुपाक्ष कुलकर्णी यांनी संरक्षण खात्याच्या हाय एक्सप्लोजिव्हफॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम केले. वाचनाची त्यांना खूप आवड होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ’माझी जन्मठेप’ या पुस्तकाचा कन्नडमध्ये अनुवाद करून विरुपाक्ष यांनी  अनुवाद क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी मराठीतून कन्नडमध्ये केलेले वीस अनुवाद प्रकाशित झाले आहेत. पु. ल. देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आणि बाबा आमटे यांच्या चरित्राचा त्यात समावेश आहे. सुनीता देशपांडे यांचे   ‘आहे मनोहर तरी’, ’भैरप्पा-कारंथ लेखन समीक्षा’, विश्वनाथ खैरे यांचे ’मिथ्यांचा मागोवा’ या साहित्यकृती देखील त्यांनी अनुवादित केल्या आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वाडमय’ या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले आहे.

मुंबई-कर्नाटक संघाचा वरदराजन आद्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. पत्नी उमा कुलकर्णी यांना कन्नड साहित्यकृतींचा मराठी अनुवाद करण्यासाठी प्रोत्साहन देताना विरुपाक्ष यांनी आपले अनुवादाचे काम बाजूला ठेवले होते.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या