शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ गायिका कुसूम शेंडे यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 17:39 IST

संगीत रंगभूमी समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेल्या प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री कुसुम गोपीनाथ शेंडे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले

पुणे : संगीत रंगभूमी समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेल्या प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री कुसुम गोपीनाथ शेंडे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. शेंडे यांच्या पश्चात प्रसिद्ध उपशास्त्रीय गायक डॉ. संजीव शेंडे व विधिज्ञ राजीव शेंडे हे दोन पुत्र तसेच सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे-साठ्ये व प्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे या त्यांच्या नाती होत. शेंडे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  कुसुम शेंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९२९ रोजी झाला. पुण्यातील जुन्या पिढीतील प्रख्यात सर्जन डॉ. के. सी. घारपुरे आणि ‘प्रोग्रेसिव्ह  ड्रॅमॅटिक असोसिएशन’च्या (पीडीए) अभिनेत्री तारामती घारपुरे यांच्या त्या कन्या. महाविद्याालयीन दशेत त्यांनी पं. हजारीलाल यांच्याकडे कथक नृत्याचे धडे गिरवले. नंतर त्या गायनाकडे वळाल्या. स्वरराज छोटा गंधर्व, सरस्वती राणे आणि ठुमरी गायिका शोभा गुर्टू यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. संगीत रंगभूमीवर त्यांची कारकीर्द गाजली. संशयकल्लोळ नाटकातील ‘रेवती’च्या भूमिकेने त्यांना लोकप्रियता दिली.‘मृच्छकटिक’,‘सौभद्र’,‘संशयकल्लोळ’,   ‘स्वयंवर’ आणि  ‘मंदारमाला’ या नाटकातील त्यांच्या अभिनय आणि गायनाला रसिकांची दाद मिळाली. स्वरराज छोटा गंधर्व, पं. राम मराठे, प्रसाद सावकार आणि रामदास कामत यांच्यासमवेत त्यांनी संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. महाराष्ट्र सरकारचा सलग तीन वर्षे पुरस्कार पटकाविणा-या त्या संगीत रंगभूमीवरील पहिल्या गायिका-अभिनेत्री ठरल्या.

पुत्र संजीव शेंडे लिखित ‘वैरीण झाली सखी’आणि ‘आम्रपाली’  या नाटकांतून त्यांनी नायिकेची भूमिका साकारली होती. संगीत नाटकातून निवृत्तझाल्यानंतर कुसुम शेंडे यांनी संगीत विद्यादानाचे काम केले. ‘भीमपलास, ‘चारुकेशी’आणि  ‘धानी’ रागातील बंदिशींची निर्मिती त्यांनी केली. 

टॅग्स :Deathमृत्यूcultureसांस्कृतिक