शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक शंकर सारडा यांचे वृध्दापकाळाने पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 18:10 IST

सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांचे बुधवारी, दि. २९ जानेवारी रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. गेल्या काही  वर्षांपासून ते पार्किन्सनने आजारी होते. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी निर्मला सारडा, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते. सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.शंकर सारडा यांचा जन्म ४ सप्टेंबर १९३७ रोजी महाबळेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण  न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले. त्यानंतर त्यांनी एस.पी. कॉलेजमधून मराठी विषयातील पदवीचे शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातून एमए केल्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी मास कम्यनिकेशनचे शिक्षणही पूर्ण केले.किशोरवयापासूनच शंकर सारडा यांचे लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती. त्यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली असून, दोन हजांराहून जास्त पुस्तकांची समीक्षा केली आहे. टॉल्स्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंब-यांचा त्यांनी अनुवाद केला आहे. सारडा यांचे १९५० पासून बालसाहित्यात मोठे योगदान आहे.  झिप-या आणि रत्नी, नंदनवनाची फेरी, दूरदेशचे प्रतिभावंत, जेव्हा चुंबनाला बंदी होते, मांत्रिकाची जिरली मस्ती, स्त्रीवादी कादंबरी, विश्वसाहित्यातील फेरफटका, बेस्टसेलर बुक्स, ग्रंथ संवत्सर, ग्रंथ वैभव, ग्रंथ विशेष अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. अमरेंद्र गाडगीळ मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार शंकर सारडा यांना देण्यात आला होता. याशिवाय, पहिल्या ह.मो.मराठे स्मृती गौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.शंकर सारडा यांनी १९६८ साली ह.मो.मराठे यांची ‘नि:ष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही कादंबरी साधनाच्या दिवाळी अंकात अतिथी संपादक या नात्याने प्रकाशित करण्याचे धैर्य दाखवले. सातारा येथे १९९३ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते.--------------शंकर सारडा यांनी भुषवलेली पदे :अध्यक्ष : अ.भा.बालकुमार साहित्य संमेलन, सावंतवाडी (१९९४)कार्याध्यक्ष : महाबळेश्वर येथील विभागीय साहित्य संमेलन (१९७०)स्वागताध्यक्ष : मराठी प्र्रकाशक परिषद (१९७८)कार्याध्यक्ष : अ.भा.मराठी साहित्य संमेलन, सातारा (१९९३)कार्याध्यक्ष : पहिले अभिजात साहित्य संमेलन, सातारा (१९९४)-----------बालसाहित्य: चतुर चंपा, मधुमुरली, राणीपरीची कृपा, झिप-या आणि रत्नी, गुराख्याचे पोर, चंद्रपरी आणि सोनसखा, राक्षसाने उचलली टेकडी, नंदनवनाची फेरी, मला मोठं व्हायचंय, देवदुताचं दु:ख, सोन्याच्या टेकडीचा शोध, जादूमंतर छू, शर्थ पराक्रमाची, मर्कटराजाच्या लीला, मांत्रिकाची जिरली मस्ती.......समीक्षा व इतर : काही पुस्तके काही लेखक, गुलमोहोर, पुस्तकांचं जग, दूरदेशचे प्रतिभावंत, ग्रंथविशेष, ग्रंथविशेष, ग्रंथचैतन्य, ग्रंथ संवत्सर, स्त्रीवादी कादंब-या, दशकातील पुस्तके, ग्रंथवैभव, विश्वसाहित्यातील फेरफटका, प्रिय चौकसराव, अक्षरभेट, बेस्टसेलर्स, लवंगी मिरच्या (हास्यकथा), जय भोलेनाथ (नाटिका), बोलके कमळ, केनेडी (चरित्र)---------------‘लोकमत’शी विशेष स्नेह :शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते. ‘अक्षरभेट’ या पुस्तकामध्ये त्यांनी ‘लोकमत’शी असलेल्या ॠणानुबंधाचा विशेष उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ‘लोकमतमुळे महाराष्ट्राच्या सर्व भागातील वाचकवर्गाचा भरघोस प्रतिसाद परीक्षणांना मिळाला. पुस्तकांना मागणीही चांगली आल्याचे प्रकाशकांकडून समजले. लोकमतचे सर्वेसर्वा विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. निर्मल दर्डा यांनी अक्षररंग पुरवणी स्वत:हून काढण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे हे लेखन झाले.’

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यDeathमृत्यूmarathiमराठी