रसिलाच्या खुनात वरिष्ठांचा सहभाग
By Admin | Updated: February 1, 2017 05:22 IST2017-02-01T05:22:49+5:302017-02-01T05:22:49+5:30
हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता असलेल्या रसिला राजू ओपी (वय २३, मूळची रा. केरळ) हिच्या खुनात कंपनीतील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा

रसिलाच्या खुनात वरिष्ठांचा सहभाग
पिंपरी : हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता असलेल्या रसिला राजू ओपी (वय २३, मूळची रा. केरळ) हिच्या खुनात कंपनीतील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असू शकतो, असा आरोप रसिलाच्या नातेवाइकांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केरळ काँग्रेसने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
रविवारी सुट्टीच्या दिवशी कामावर आलेल्या रसिलाचा वॉचमनने केबलने गळा आवळून खून केला. या घटनेनंतर केरळहून पुण्यात आलेल्या तिचे वडील व काकांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. रसिलाने कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाच होत असल्याची तक्रार करून बदलीचीही मागणी केली होती. मात्र त्याकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे यात केवळ वॉचमनच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असू शकतो, त्यादृष्टीने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी केली. कंपनीने एक कोटी रुपये मदत देण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा आहे. कंपनीकडून त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले, भरपाई देण्याचा मुद्दा कंपनीच्या अखत्यारितील आहे. आमच्याकडे अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. कंपनीतर्फे देण्यात येणारी देय रक्कम, विमा मिळून भरपाई त्यांना मिळू शकेल. आरोपी भाबेन भराली सैकिया (वय २६, मूळ रा. आसाम) याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
‘सखोल चौकशी करावी’
थिरुअनंतपुरम : केरळचे विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सखोल चौकशीची मागणी केली. ‘रसिलाच्या हत्येचे काहीतरी गूढ असून, इतर काहींचा यात हात होता, असे नातेवाइकांनी मला सांगितले. कंपनीचीही मोठी चूक आहे, अशी तक्रार त्यांनी केली.