ज्येष्ठ नेते बाबासाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST2021-09-18T04:11:20+5:302021-09-18T04:11:20+5:30

लासुर्णे : इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती व ज्येष्ठ नेते बाबासाहेब शंकरराव पाटील (वय ९४) यांचे शुक्रवारी लासुर्णे येथे ...

Senior leader Babasaheb | ज्येष्ठ नेते बाबासाहेब

ज्येष्ठ नेते बाबासाहेब

लासुर्णे : इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती व ज्येष्ठ नेते बाबासाहेब शंकरराव पाटील (वय ९४) यांचे शुक्रवारी लासुर्णे येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, विवाहित मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

बाबासाहेब पाटील यांनी लासुर्णेचे सरपंच, छत्रपती साखर कारखान्याचे संचालक व इंदापूर पंचायत समितीचे सलग ११ वर्षं सभापतिपद भूषवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व ज्येष्ठ नेते ॲड. तेजसिंह पाटील व डॉ. योगेश पाटील यांचे वडील, तर लासुर्णेचे सरपंच सागर पाटील यांचे ते आजोबा होत. दरम्यान, बाबासाहेब पाटील यांच्या पार्थिवाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माजी आमदार विजयराव मोरे, ‘छत्रपती’चे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांनी दर्शन घेतले.

१७०९२०२१-बारामती-२७

Web Title: Senior leader Babasaheb