शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 20:46 IST

मध्ययुगातील साहित्य आणि अभिजात साहित्य या प्रकारात भरीव योगदान दिल्याबद्दल डॉ. दीक्षित यांना साहित्य अकादमीतर्फे भाषा सन्मान प्रदान करण्यात आला होता.

पुणे : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ हिंदीसाहित्यिक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांचे (वय ९४) दीर्घ आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे चार कन्या आहेत. गेल्या महिनाभरापासून डॉ. दीक्षित आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजारीदशेतही त्यांनी लेखनाचा ध्यास सोडला नाही.  सध्या एका पुस्तकाचे ते लेखन करीत होते. या पुस्तकाचे लवकर प्रकाशन व्हावे, ही त्यांची इच्छा होती. मात्र, प्रकृतीने साथ न दिल्याने मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  डॉ. दीक्षित यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1925 रोजी उत्तर प्रदेशातील मिरूट येथे झाला.त्यांनी हिंदी आणि संस्कृत या विषयांमध्ये एम. ए. पदवी संपादन केली.हिंदी भाषेमध्ये प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. मिळविली. साहित्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि काव्य हे त्यांच्या आवडीचे तर हिंदीसह मराठी, इंग्रजी, बंगाली, गुजराती या भाषांमधील काव्य हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. रस सिद्धांत स्वरूप विश्लेषण,त्रेता : एक अंत:यात्रा , हिंदी रिती-परम्परा विस्मृत संदर्भ ही त्यांची पुस्तके हिंदी साहित्यामध्ये महत्त्वाची मानली जातात. कै. शांतीलाल भंडारी यांच्या महाभारत ग्रंथातील स्त्री व पुरूषांचे समीक्षात्मक मूल्यमापन करणारा भारतायन हा ग्रंथ त्यांनी हिंदीमध्ये लिहिला. मुंबईच्या साहित्य अकादमी तर्फे त्यांना या ग्रंथासाठी उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कारही मिळाला. मध्ययुगातील साहित्य आणि अभिजात साहित्य या प्रकारात भरीव योगदान दिल्याबद्दल डॉ. दीक्षित यांना नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीतर्फे फेब्रुवारी २०१७ मध्ये भाषा सन्मान प्रदान करण्यात आला होता. डॉ. दीक्षित हे १९६६ ते १९८५ पर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठात हिंदी विभाग प्रमुख होते. तर, २०१०पर्यंत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. हिंदी विभागात त्यांनी  प्रयोजनमूलक हिंदी हा अभ्यासक्रम सुरू केला. इंदूर येथील हिंदी साहित्य समितीतर्फे अखिल भारतीय साहित्य पारितोषिक, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे अखिल भारतीय सेवा पुरस्कार, अलाहाबाद येथील हिंदी साहित्य संमेलनात साहित्य वाचस्पती, कानपूर येथील हिंदी साहित्य समितीतर्फे साहित्य भारती, लखनऊ  येथील उत्तर प्रदेश हिंदी संस्थानतर्फे साहित्यभूषण असे मानाचे सन्मान त्यांना यापूर्वी प्रदान करण्यात आले होते. उत्तरप्रदेशमधील हिंदी संस्थेच्या वतीने भाषेतील योगदानाबददल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते डॉ. दीक्षित यांना  भारत भारती सन्मान प्रदान करण्यात आला होता. भारतीय भाषा न्यास संस्थेचे ते संस्थापक- अध्यक्ष होते. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यhindiहिंदी