शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ संपादक व लेखक सदा डुंबरे यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 20:17 IST

गेले दहा- बारा दिवस कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुणे : ज्येष्ठ संपादक व लेखक सदा डुंबरे यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेले दहा- बारा दिवस कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. डुंबरे यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.सदा डुंबरे यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात पार पडले. फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिक विज्ञानातील पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी संपादन केली. इंग्लंडच्या ‘थॉम्सन फाऊंडेशन’चा प्रगत पत्रकारितेचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र व संज्ञापन विभागात अतिथी प्राध्यापक, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, ‘इंडसर्च’ या व्यवस्थापनशास्त्र संस्थेच्या अभ्यासमंडळाचे सदस्य अशी पदे त्यांनी भूषवली आहेत. डुंबरे हे ‘भारतीय जैन संघटना’ या संस्थेचे पाच वर्षे संचालक होते.सदा डुंबरे यांनी लिहिलेली ‘आरसपानी’, ‘प्रतिबिंब’, ‘दशकवेध’, ‘कर के देखो’ आणि ‘देणारं झाड’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनिल अवचट यांच्यावरील ‘वेध अवलियाचा’ या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले आहे. दिल्लीची प्रेस इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया, पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट अशा संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन केले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेJournalistपत्रकारDeathमृत्यू