प्रचारामुळे ज्येष्ठ नागरिक त्रस्त
By Admin | Updated: February 18, 2017 02:30 IST2017-02-18T02:30:34+5:302017-02-18T02:30:34+5:30
उमेदवाराच्या प्रचारासाठी रिक्षामधून प्रत्येक पक्षाची जाहीरातबाजी मोठ्या आवाजात केली जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक मात्र त्रस्त

प्रचारामुळे ज्येष्ठ नागरिक त्रस्त
कोरेगाव मूळ : उमेदवाराच्या प्रचारासाठी रिक्षामधून प्रत्येक पक्षाची जाहीरातबाजी मोठ्या आवाजात केली जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. प्रचार करणारी रिक्षा एकाच ठिकाणी तासन्तास उभी केली जात आहे. शाळा-महाविद्यालयातील परीक्षांचा कालावधी सुरू झाला आहे. बारावीच्या परीक्षा उद्या-परवा सुरू होतील, त्यानंतर लगेच दहावीच्या परीक्षा आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्ग अभ्यासात गुंतला आहे. मात्र, अभ्यासासाठी लागणारी शांतता प्रचार करणाऱ्या रिक्षांमुळे भंग होत आहे.
प्रत्येक मतदाराच्या घरी उमेदवार आपली ओळख म्हणून पत्र वा प्रचारपत्रक छायाचित्रानिशी पाठवत असतो. न केलेल्या कामाचे श्रेयही त्यामध्ये घेतलेले असते. मतदानाच्या आदल्या दिवशी तर प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते तुमचे मतदान कोणत्या ठिकाणी आहे, अगदी क्रमांकासह माहिती घेऊन येतात. तर काही प्रलोभने देत मतदान आम्हालाच करायचे, चिन्ह लक्षात ठेवा आपला उमेदवार आहे, अशी खास मवाळकीची भाषा वापरतात. (वार्ताहर)