खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठीही ज्येष्ठ नागरिक पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:09+5:302021-03-17T04:13:09+5:30
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या खाजगी रुग्णालयांमध्ये २५० रुपयांमध्ये ...

खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठीही ज्येष्ठ नागरिक पुढे
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या खाजगी रुग्णालयांमध्ये २५० रुपयांमध्ये लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दोन डोसचा मिळून ५०० रुपये खर्च येणार आहे. लसीकरण लवकरात लवकर व्हावे, या उद्देशाने आणि शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या गर्दीत आपला नंबर लागेल की नाही, या शंकेतून ज्येष्ठ नागरिक खाजगी रुग्णालयांमधील लसीकरणाला प्राधान्य देत आहेत.
---
आतापर्यंत जिल्ह्यात किती जणांनी लस घेतली? - ३,२९,१२६
ज्येष्ठ नागरिक किती - १,२४,७१५
इतर किती - २,०४,४११
---
गेल्या एक वर्षापासून आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहोत. रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असल्याने आणि वयही ६० हून अधिक असल्याने सतत कोरोनाची भीती मनात असते. लसीकरण सुरु झाल्यानंतर खूप बरे वाटले. ३ मार्चला लस घेतली आणि अर्धे संकट दूर झाल्यासारखे वाटले. लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, दंड दुखणे असा कोणताही त्रास झाला नाही. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपणहून लसीकरणासाठी पुढे यायला हवे.
- गुरुदेव सिंग
---
कौैटुंबिक कारणांमुळे सतत पुणे-मुंबई असा प्रवास सुरु असतो. ऑगस्ट महिन्यात पती, मुलाला कोरोना झाला आणि आम्हा सर्वांचेच धाबे दणाणले. पतीची तब्येत खूपच गंभीर झाली होती. आम्ही सर्वजण खूप टेन्शनमध्ये होतो. कोरोनाचे संकट शत्रूवरही येऊ नये, असे वाटते. त्यामुळेच लसीकरण सुरु झाल्या झाल्या दुसऱ्याच दिवशी आम्ही दोघांनी लस टोचून घेतली. लसीमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत नक्कीच होईल.
- मनाली केळकर