शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पोलीस असल्याची बतावणी करून पुण्यात ज्येष्ठाला साडेबारा हजाराचा गंडा, एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 18:32 IST

पोलीस असल्याची बतावणी करून सीसीटीव्ही फुटेज रद्द करण्यासाठी पैशाची मागणी करीत चार जणांनी ज्येष्ठ नागरिकाला साडेबारा हजार रूपयांना गंडा घातला.

ठळक मुद्देविजयमारूती चौक व सिटी पोस्ट आॅफिस एटीएम सेंटर येथे २९ नोव्हेंबर रोजी घडला प्रकार एकाला अटक करण्यात आली असून, इतर तिघांविरूद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून सीसीटीव्ही फुटेज रद्द करण्यासाठी पैशाची मागणी करीत चार जणांनी ज्येष्ठ नागरिकाला साडेबारा हजार रूपयांना गंडा घातला. बुधवार पेठेतील विजयमारूती चौक व सिटी पोस्ट आॅफिस एटीएम सेंटर येथे २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा प्रकार घडला.  त्यापैकी एकाला अटक करण्यात आली असून, इतर तिघांविरूद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथे राहणाऱ्या एका ६२ वर्षीय नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार अंकुश परशुराम भिसे (वय ३५, रा. विंझर, ता.वेल्हा) यास अटक करण्यात आली आहे. तर मेहबुब समीर शेख, अंकुश लोंढे उर्फ कांबळे आणि लंबु यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटी पोस्ट आॅफिस एटीएम सेंटर याठिकाणी हे चार आरोपी फिर्यादी यांच्या जवळ आले. आम्ही सिव्हील पोलीस असून, तुमचे सीसीटीव्ही फुटेज आले आहे. ते फुटेज कॅ न्सल करायचे असेल आणि सगळे प्रकरण इथेच मिटवायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावी लागतील म्हणून त्यांनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली आणि फिर्यादी कडून एकूण १२ हजार ५०० रूपयांची रक्कम काढून घेतली. याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एन. शिंदे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :faraskhana policeफरासखाना पोलीसPuneपुणे