लसीच्या तुटवड्यामुळे ज्येष्ठांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:11 IST2021-03-19T04:11:34+5:302021-03-19T04:11:34+5:30

केंद्र सरकारच्या आडमुठे भूमिकेमुळे कोव्हिशिल्डचा दुसरा डोस घेण्यात अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. मागील पंधरा दिवसांपासून ...

Senior care due to shortage of vaccines | लसीच्या तुटवड्यामुळे ज्येष्ठांची हेळसांड

लसीच्या तुटवड्यामुळे ज्येष्ठांची हेळसांड

केंद्र सरकारच्या आडमुठे भूमिकेमुळे कोव्हिशिल्डचा दुसरा डोस घेण्यात अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मागील पंधरा दिवसांपासून ६० वयोगटांपुढील ज्येष्ठ नागरिकांना व ४५ वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्यानां महापालिका आणि खासगी रुग्णालयामध्ये कोव्हिशिल्ड लस दिली जात आहे. मात्र, अचानक को-व्हॅकिसन सुरू केल्यामुळे ज्यांनी पहिला डोस कोव्हिशिल्डचा घेतला, त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता दुसरा डोस कुठे आणि कसा घ्यायचा, असा प्रश्न पडला आहे. प्रशासनाने तातडीने याबाबत खुलासा करावा.

यापूर्वी ज्यांनी कोव्हिशिल्डचा डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस उपलब्ध करून देणे ही, जबाबदारी केंद्र सरकारची आहे. शासनाने तातडीने नियोजन करून लस उपलब्ध करून दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

- डॉ. शंतनू जगदाळे

हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष

कोट

सध्या ज्या केंद्रावर कोव्हिशिल्डचे लसीकरण सुरू आहे, तेच नियोजन कायम ठेवले पाहिजे. एकाच केंद्रावर दोन्ही लसी उपलब्ध करून दिल्या तर नागरिकांचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेल्या केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या लसीकरणाचे नियोजन करता येऊ शकते, असे सूचविले आहे. ससून रुग्णालयामध्ये सध्या कोव्हिशिल्डचे 2000 डोस शिल्लक आहेत. दररोज सरासरी 300-350 जणांना लसीकरण केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

- डॉ. मुरलीधर तांबे

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता

Web Title: Senior care due to shortage of vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.