जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:52+5:302021-03-15T04:11:52+5:30

जेजुरीचा खंडेराया व नाना यांचे जुने ऋणानुबंध आहेत. १९८० साली संगीतकार राम कदम यांनी ‘गड जेजुरी जेजुरी’ या ...

Senior actor Nana Patekar took darshan of Kuldaivata | जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

जेजुरीचा खंडेराया व नाना यांचे जुने ऋणानुबंध आहेत. १९८० साली संगीतकार राम कदम यांनी ‘गड जेजुरी जेजुरी’ या चित्रपट निर्मितीला सुरुवात केली होती. या चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत नाना पाटेकर होते. तर अभिनेत्री उषा काळे होत्या. चित्रीकरणाच्या दरम्यान बराच काळ नानांचे वास्तव्य जेजुरीत होते. नाना पाटेकर यांचा हा पहिला चित्रपट असला तरी तो आर्थिक अडचणीमुळे पूर्ण होऊ शकला नाही व प्रदर्शित झाला नाही. मात्र, चित्रनिर्मितीत पदार्पण त्यांचे जेजुरीतूनच झाले.

त्यानंतर २०१९ साली मार्तंड देवसंस्थानच्या वतीने नाना पाटेकर यांना ‘मल्हार रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

रविवारी (दि. १४) नाना पाटेकर यांनी कुलदैवत खंडेरायाचे देवदर्शन घेत कुलधर्म -कुलाचार केला. देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

फोटो : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा देवसंस्थानच्या वतीने सन्मान करताना विश्वस्त

Web Title: Senior actor Nana Patekar took darshan of Kuldaivata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.