शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या पतीच्या मुलास पैसे पाठवते; दुसऱ्या पतीनं डोक्यात दगड घालून केला पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 16:43 IST

नर्सरीमध्ये मिळणा-या कामाचे पैसे तिचे पहिल्या पतीच्या मुलास पाठवित असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद होत असे

लोणी काळभोर : नर्सरीमध्ये मिळणा-या कामाचे पैसे तिचे पहिल्या पतीच्या मुलास पाठवित असल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दुसऱ्या पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घुनपणे खुन केला असल्याची घटना सोरतापवाडी (ता. हवेली) येथे घडली आहे. 

गोमती भोपाली केवट, वय-४९, (रा. संदिप रोझ नर्सरी, सोरतापवाडी, हवेली,) असे खून झालेल्या महिलेचे नाव  आहे. नर्सरीमालक अमर काळुराम पांगारकर (वय ४७, रा. महादेव नगर, सोरतापवाडी, ता. हवेली.) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तिचा पती मुरली चैनु केवट (वय ३६, मुळगाव- राजनगर नोहरा, आचरोणी, नोहरा, खानियाधना, शिवपुरी, मध्यप्रदेश.) याला अटक करण्यात आली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांगारकर यांनी दत्तात्रय दाभाडे यांचे जागेत भाडेतत्वावर संदिप रोझ नर्सरी नावाने नर्सरी व्यवसाय सुरू केला आहे. तेथे इतर कामगारांसमवेत केवट पती पत्नी काम करतात. गोमतीला तिच्या पहिल्या पतीपासून निरज नावाचा एक मुलगा आहे. तो मध्यप्रदेश येथे राहण्यास असून तो कधीमधी नर्सरीवर येत असतो. तसेच गोमती ही नर्सरीचे कामातून मिळणारे पैसे मुलास पाठवित असे. त्यामुळे गोमती व मुरली या दोघांमध्ये कामाच्या पैश्यावरून भांडण होत असे. तसेच गोमती तिचे मुलास पाठवित असणारे पैश्यामुळे दोघांत वारंवार भांडणे व वादविवाद होत असत. भांडणे झाल्यानंतर पांगारकर कधी कधी जावुन भांडणे मिटवुन त्यांना शांत राहण्यास सांगत होते.

रविवार (१३ मार्च) रोजी ते घरी असताना रात्री १०-३० वाजण्याच्या सुमारांस नर्सरीवर काम करणारे सुरेश यांनी त्यांना गोमती व मुरली यांचेमध्ये भांडणे झाली असल्याचे पांगारकर यांना सांगितले. ते तात्काळ नर्सरीवर गेले असता त्यांना घरासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत गोमती बेशुध्द अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या डोक्यातून रक्त येत होते. त्यावेळी आसपासच्या नागरिकांनी सांगितले की, गोमती व मुरली यांच्यामध्ये जोरजोरात भांडणे सुरु होती. तेव्हा  मुरली यांनी गोमतीच्या डोक्यात दगड घालून तिला जखमी केले. व त्यानंतर मुरली कोठेतरी निघुन गेला आहे. पांगारकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले नंतर रुग्णवाहिकेतून गोमती हिस ससुन रूग्णालय पुणे येथे पाठवले. तेथील डॉक्टरांनी गोमतीची तपासणी करुन मृत झाल्याचे घोषित केले. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरmarriageलग्नWomenमहिलाPoliceपोलिसArrestअटक