चोरीच्या मोबाइलची बांगलादेश सीमेवर विक्री
By Admin | Updated: September 17, 2014 00:25 IST2014-09-17T00:25:43+5:302014-09-17T00:25:43+5:30
शहरातून चोरलेले मोबाइल एकत्र करून त्यांची थेट बांगलादेशाच्या सीमेवर नेऊन विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाली आहे.

चोरीच्या मोबाइलची बांगलादेश सीमेवर विक्री
पुणो : शहरातून चोरलेले मोबाइल एकत्र करून त्यांची थेट बांगलादेशाच्या सीमेवर नेऊन विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाली आहे. मोबाइल चोरीच्या तपासासाठी परराज्यात जाऊन तपास करणो शक्य नसल्याने चोरटय़ाचे चांगलेच फावले आहे.
शहरामध्ये मोबाइल चोरीला गेल्याच्या शेकडो तक्रारी दाखल होतात. याप्रकरणाचा पोलीस तपास करीत असताना चोरीला गेलेले मोबाइल बांगलादेश तसेच पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये विक्री सुरू असल्याचे उजेडात आले. मंडई, तुळशीबाग अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरणारी टोळी कार्यरत आहे. नजर चुकवून, महिलांची पर्स हिसकावून मोबाईल चोरले जात आहेत.
(प्रतिनिधी)
महागडे मोबाइल कवडीमोल भावात
4स्मार्ट फोनची क्रेझ झाल्याने मोबाइलच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. दहा हजारांपासून ते लाख रुपयांर्पयतचे मोबाइल लोक वापरत आहेत. हजारो रुपये किमतीचे हे मोबाइल बांगलादेशच्या सीमेवर अत्यंत कवडीमोल भावाने विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मोबाइल चोरीच्या तपासासाठी परराज्यात जाणो पोलिसांना शक्य नसल्याने तपासाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे मोबाइल चोरणा:या टोळीला पकडण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.