गावठी दारूविक्री; दोघे ताब्यात
By Admin | Updated: January 25, 2017 01:35 IST2017-01-25T01:35:35+5:302017-01-25T01:35:35+5:30
गावठी हातभट्टीची दारू विकताना करंजेपूल पोलिसांनी दोन जणांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची

गावठी दारूविक्री; दोघे ताब्यात
सोमेश्वरनगर : गावठी हातभट्टीची दारू विकताना करंजेपूल पोलिसांनी दोन जणांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती करंजेपूल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार पोळ यांनी दिली.
ज्योती रणजित रावळकर (रा. वाघळवाडी, कन्नडवस्ती) आणि अनिल रूपसिंग नवले (रा. वाघळवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण १५ लिटर प्लास्टिक पिशवी बंद दारू जप्त करण्यात आली आहे. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार पोळ, पोलीस नाईक विठ्ठल कदम, सचिन वाघ, धर्मवीर खांडे, पोलीस नाईक बोराडे, महिला पोलीस अहिवळे, पोलीसमित्र स्वप्नील काकडे, मल्हारी लोखंडे यांनी ही कारवाई केली. करंजेपूल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये जुगार, मटका आणि इतर अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू असून, तडीपाराची कारवाई करण्यात येईल, असे पोळ यांनी सांगितले.