शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘ त्या’ पतसंस्थेच्या संचालकांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे द्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 16:33 IST

तब्बल १६०० कोटी रुपयांच्या बेनामी ठेवींच्या गैरव्यवहारामुळे भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्था अडचणीत आली आहेत.

ठळक मुद्देजनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या वतीने गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मागणी 

पुणे : तब्बल १६०० कोटी रुपयांच्या बेनामी ठेवींच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या संचालकांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षक कायद्याने (एमपीआयडी) गुन्हा दाखल होऊन चार वर्षे उलटूनही कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. कायद्यानुसार संचालकांच्या मालमत्ता विक्रीची तत्काळ कार्यवाही करुन ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत कराव्यात अशी मागणी जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या वतीने राज्याचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे. बीएचआर संस्थेच्या संचालकांवर ५३ पोलिस ठाण्यांत एमपीआयडी कायदयानुसार गुन्हे दाखल आहेत. संस्थेचे संस्थापक प्रमोद रायसोनी यांच्यासह १४ संशयीत आरोपी असलेले संचालक गेल्या ४ वर्षांपासून अटकेत आहेत. एमपीआयडी कायद्यात वित्तीय संस्थेच्या संचालकांच्या खाजगी मालमत्ता जप्त करुन त्याच्या विक्रीतून ठेवीदारांना ३ महिन्यात ठेवींचा परतावा करण्याची तरतूद आहे. सरकारच्या गृह विभागाकडे या वित्तीय संस्थेच्या संचालकांच्या मालमत्ता विक्रीची अधिसूचना काढण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचा दावा संघटनेने केला आहे. जनसंग्राम संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी मंगळवारी (दि. २९) गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांची मुंबईत भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. बीएचआरच्या मालमत्ता विक्रीचे अधिकार बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधकांना देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या गृह विभागाकडे (अपील व सुरक्षा शाखा) एमपीअयडी कायद्यांतर्गत परिपूर्ण प्रस्ताव सादर करुनही बँकेच्या संचालकांची मालमत्ता विक्रीची अधिसूचना प्रसिद्ध होण्यास विलंब होत आहे. ही कार्यवाही शीघ्र व्हावी म्हणून या गुन्ह्यातील सर्व तपासाधिकारी, सीआयडीचे तपास पथक, संस्थेचे अवसायक, लोकायुक्त यांच्याकडे देखील तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी गृह विभागानेच ठेवीदार व यासाठी नियुक्त सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून मालमत्ता विक्रीची तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसbankबँक