आळेफाटा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:12+5:302021-02-23T04:16:12+5:30
या स्पर्धेचे उदघाटन जुन्नर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ कोराळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्याध्यक्ष विलास कदम, जालिंदर ...

आळेफाटा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी
या स्पर्धेचे उदघाटन जुन्नर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ कोराळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्याध्यक्ष विलास कदम, जालिंदर ढमाले, सचिन मुंढे, पांडुरंग गाडेकर, संजय गुंजाळ, सुरेश काकडे, संतोष शिंदे, बाळासाहेब भालेराव, प्रशिक्षक दत्ता गावडे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत माती व मॅटवर झालेल्या स्पर्धेसाठी ५३ मल्लांनी सहभाग घेतला होता. मातीवरील स्पर्धेत प्रणव तांबे (५७ किलो वजनगट), प्रतीक गवारी (६१ किलो वजनगट), निर्मल रोहिदास (६५ किलो वजनगट), सुरेश काकडे (७० किलो वजनगट), अनिष्का डावखर हे मल्ल विजयी झाले, तर गादीवरील स्पर्धेत विशाल डावखर (५७ किलो वजनगट), ओंकार डुंबरे (६१ किलो वजनगट), अजिंक्य डुंबरे (६५ किलो वजन गट), अक्षय गवारी (७० किलो वजनगट), प्रकाश कवाडी (८६ किलो वजनगट), ओंकार शिंदे यांची निवड झाली असून मॅटच्या झालेल्या स्पर्धेत अक्षय तांबे, प्रतीक गवारी हे मल्ल विजयी झाले आहेत.
२२आळेफाटा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी तालुकास्तरीय निवड चाचणीदरम्यान कुस्ती लावताना उपस्थित मान्यवर.