सासवडमध्ये १३ फेब्रुवारीला महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST2021-02-13T04:11:49+5:302021-02-13T04:11:49+5:30

निवड चाचणी स्पर्धेच्या नियोजनाबाबत तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार संजय जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सदस्यांची सासवड येथे बैठक ...

Selection test competition for Maharashtra Kesari on 13th February in Saswad | सासवडमध्ये १३ फेब्रुवारीला महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धा

सासवडमध्ये १३ फेब्रुवारीला महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धा

निवड चाचणी स्पर्धेच्या नियोजनाबाबत तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार संजय जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सदस्यांची सासवड येथे बैठक झाली. याप्रसंगी जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य पै. राजेंद्र जगताप, तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै. विनोद जगताप, रविंद्र जगताप, व्यायाम मंदिराचे व्यवस्थापक पै. माउली खोपडे यांसह सदस्य उपस्थित होते. वरिष्ठ गटात या निवड स्पर्धा होणार आहेत. दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत स्पर्धकांची वजने घेतली जाणार असून आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दुपारी १२ वा स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. दु १२ पासून रात्री ९ पर्यंत या निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत. बाल आणि कुमार गटातील स्पर्धा गादी विभागात तर वरिष्ठ गटातील स्पर्धा गादी आणि माती विभागात वजन गटनिहाय होणार आहेत.

स्पर्धेसाठी वजनगट पुढीलप्रमाणे :- वरिष्ठ गट - गादी व माती विभाग - ५७ किलो, ६६ किलो, ७१ किलो, ७६ किलो, ८१ किलो, ८६ किलो, ९१ किलो, ९७ किलो, १०५ किलो. आणि ८६ ते १२५ किलो खुला गट.

Web Title: Selection test competition for Maharashtra Kesari on 13th February in Saswad