तन्वी बहिरटची संचलनासाठी निवड
By Admin | Updated: January 26, 2017 00:58 IST2017-01-26T00:58:32+5:302017-01-26T00:58:32+5:30
नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी जिल्ह्यातून तन्वी वैभव बहिरट हिची निवड झाली आहे. राजपथावरील

तन्वी बहिरटची संचलनासाठी निवड
पुणे : नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी जिल्ह्यातून तन्वी वैभव बहिरट हिची निवड झाली आहे. राजपथावरील संचलनासाठी तन्वी हिची फर्स्ट बेस्ट म्हणून निवड झाली आहे.
राज्यातील विविध भागांतील ९ मुलींची निवड संचलनासाठी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुलींचा चमू दिल्ली येथे सराव करत आहे. तन्वी शिवाजीनगर गावठाण येथील रहिवासी आहे. तन्वी हिने तलवारबाजीमध्ये राज्यपातळीवरील पारितोषिके पटकाविली आहेत. लहानपणापासूनच तिला तलवारबाजीमध्ये रस आहे. ती सध्या गरवारे महाविद्यालयामध्ये बीबीए करत आहे.
(प्रतिनिधी)