सदर्न कमांडच्या १२२ इन्फंट्रीची निवड
By Admin | Updated: August 13, 2014 04:17 IST2014-08-13T04:17:58+5:302014-08-13T04:17:58+5:30
देशभरातील लष्कराच्या संस्थांमधील सर्वोत्कृष्ट बटालियन निवडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणा-या स्पर्धेसाठी सदन कमांडच्या १२२ इन्फ्रन्ट्री बटालियन टीए मद्रासची निवड झाली आहे.

सदर्न कमांडच्या १२२ इन्फंट्रीची निवड
पुणे : देशभरातील लष्कराच्या संस्थांमधील सर्वोत्कृष्ट बटालियन निवडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणा-या स्पर्धेसाठी सदन कमांडच्या १२२ इन्फ्रन्ट्री बटालियन टीए मद्रासची निवड झाली आहे.
आज झालेल्या कार्यक्रमात सदन कमांडचा प्रादेशिक सेना ध्वज सदन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांच्या हस्ते बटालियनला प्रदान करण्यात आला. या बटालियनने सलग सहा वेळा हा ध्वज मिळवला आहे. कर्नल हरमनजित सिंग हे
सध्या बटालियनचे प्रमुख आहेत. याबाबत सिंग म्हणाले, ‘‘यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेली ही बटालियन आता अन्य कमांडमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या बटालियनसाठी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होईल आणि या स्पर्धेत देशभरातून सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या प्रादेशिक
सेना बटालियनला लष्कर प्रमुखाचे रौप्यपदक मिळेल.’’ (प्रतिनिधी)