शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

फ्रान्सच्या जागतिक संगीत महोत्सवात पुण्याच्या ‘केहेन’ बँंडची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 19:57 IST

फ्रान्समधील बेलफोर्ट शहरात आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव साजरा होतो. महोत्सवाचे यंदाचे 33वे वर्ष आहे.

ठळक मुद्देशास्त्रीय संगीतातील रागांवर आधारित ‘फ्युजन’चे करणार सादरीकरण महोत्सवातील सादरीकरणासाठी जगभरातील 1185 पेक्षा जास्त बंँडमधून 101 बँडची निवड प्रणाली काळे, अनुप गायकवाड, प्रफुल सोनकांबळे आणि विश्वनाथ गोसावी या कलाकारांचा सहभाग विश्व बंधुत्वाचा देणार संदेश

पुणे : फ्रान्समधील बेलफोर्ट शहरात होत असलेल्या जागतिक संगीत महोत्सवामध्ये  ‘फ्युजन’ प्रकारात भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित रचना सादर करण्याची संधी पुण्यातील चार तरुण गायक-वादकांच्या  ‘केहेन’ बँडला मिळाली आहे. हा महोत्सव दि. ६ ते १० जून या कालावधीत होत आहे.हे कलाकार आहेत,  प्रणाली काळे, अनुप गायकवाड, प्रफुल सोनकांबळे आणि विश्वनाथ गोसावी! या चौघा कलाकारांनी मिळून ‘केहेन’ बँडची निर्मिती केलेली आहे. हे चौघेही कलाकार भारतीय शास्त्रीय संगीताचे अभ्यासक तर आहेतच पण इतर संगीत प्रकारात सुद्धा त्यांना मनापासून रूची आहे. नव्या पिढीपर्यंत शास्त्रीय संगीत एका वेगळ्या प्रकारातून कसे पोहोचेल हा ध्यास या तरुणाईला आहे.शास्त्रीय संगीताच्या वाटेवरुन जात असताना पाश्चिमात्य धर्तीवरील संगीताची रळही त्यांना पडली. या सर्वांचा उहापोह म्हणजे '' केहेन''..!पुण्यातील भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयात प्रणाली काळे, प्रफुल सोनकांबळे (गायक), विश्वनाथ गोसावी (हार्मोनियम व सिंथेसायझर) व अनुप गायकवाड (तबला व तालवाद्य) विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देतात.फ्रान्समधील बेलफोर्ट शहरात आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव साजरा होतो. महोत्सवाचे यंदाचे 33वे वर्ष आहे. या महोत्सवातील सादरीकरणासाठी जगभरातील 1185 पेक्षा जास्त बंँडमधून 101 बँडची निवड करण्यात आली आहे. यामध्ये निवड झालेला केहेन हा एकमेव भारतीय बँड आहे. महोत्सवासाठी निवड झालेल्या 101 बँडची निवड विख्यात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, संगीत दिग्दर्शक, संयोजक यांनी केली आहे.संस्थेच्या शिक्षकांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत महोत्सवासाठी निवड होणे ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. फ्रान्स दौ-यासाठी या शिक्षकांना सर्व प्रकारचे सहाय्य व सहकार्य केले आहे, असे गांधर्व महाविद्यालयाच्या उपप्राचार्या परिणीता मराठे यांनी सांगितले.-------------------------------------------------------------------------------’भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित फ्युजन या प्रकारात मोडणा-या रचना ‘केहेन’ने बांधलेल्या आहेत. डेन्मार्क, ब्राझिल, बल्गेरिया, फ्रान्स या देशांमधील पारंपरिक व आधुनिक संगीताचा सादरीकरणात समावेश केलेला आहे. या सादरीकरणातून सर्व कलाकार मिळून ‘केहेन’च्या माध्यमातून विश्वबंधुत्वाचा संदेश देऊ इच्छितो-  प्रणाली काळे, कलाकार-----------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेFranceफ्रान्सmusicसंगीत