संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:07 IST2021-06-30T04:07:50+5:302021-06-30T04:07:50+5:30

या सभेमध्ये एकूण ७३ अर्जांची छाननी करण्यात आली, त्यापैकी ३२ प्रकरणे संजय गांधी योजनेंतर्गत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील विधवा ...

Selection of Beneficiaries under Sanjay Gandhi Yojana | संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड

संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड

या सभेमध्ये एकूण ७३ अर्जांची छाननी करण्यात आली, त्यापैकी ३२ प्रकरणे संजय गांधी योजनेंतर्गत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांना मंजूर झाली आहेत. संजय गांधी योजनेचे १६ प्राप्त अर्जांपैकी १६ मंजूर, श्रावणबाळ योजनेचे २२ प्राप्त अर्जांपैकी १६ अर्ज मंजूर तर ०६ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्त ०३ अर्जांपैकी ०३ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यावेळी संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक, सदस्य सुनील बनसोडे, जीवना मोरे, शिवराज माने, शहाजी दळवी, प्रवीण गालिंदे, लालासो होळकर, नीलेश मदने, अशोक इंगुले, नुसरत इनामदार तसेच शासकीय सदस्य तहसीलदार विजय पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार महादेव भोसले उपस्थित होते.

---------------------------

Web Title: Selection of Beneficiaries under Sanjay Gandhi Yojana