लष्करी आळीच्या वाढत्या प्रादुर्भावर बीज प्रक्रिया फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST2021-07-27T04:12:40+5:302021-07-27T04:12:40+5:30
-- इंदापूर : सध्य पावसाळा दिवस असल्याने, पिकांना नुकसान पोहचवणाऱ्या, लष्करी आळीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, पिंकांवर ...

लष्करी आळीच्या वाढत्या प्रादुर्भावर बीज प्रक्रिया फायदेशीर
--
इंदापूर : सध्य पावसाळा दिवस असल्याने, पिकांना नुकसान पोहचवणाऱ्या, लष्करी आळीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, पिंकांवर लष्करी आळीची वाढ झपाट्याने होत आहे. या आळीला रोखण्यासाठी व समूळ नष्ट करण्यासाठी पेरणीपुर्वी बी प्रक्रिया करणे फायदेशीर ठरत आहे असे मत कृषी कन्या अमृता शिर्के यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील वडापुरी मधील ( पंधारवाडी ) शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन स्थानिक नागरिकांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी वडापूरी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेती उपयुक्त माहिती तसेच विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यावेळी कृषी कन्या शिर्के बोलात होत्या.
यावेळी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी .कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा .एस. आर. आडत, प्रा. ए. बी. तमनार, विषयतज्ञ प्रा. डी. ए. ठवरे, प्रा. डी. पी. बरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिपूरक उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी श्रीकांत पवार, नवनाथ शिर्के, दत्तात्रय शिर्के, किशोर पवार, संतोष शिर्के, तुषार पवार वडापुरी गावाच्या पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--
फोटो २६ इंदापूर आळीचा प्रादुर्भाव
फोटो ओळ : शेतकऱ्यांच्या बांधावर जावून लष्करी आली बाबत माहिती देताना कृषी कन्या अमृता शिर्के