दुसऱ्या फेरीतही ‘कट-ऑफ’ नव्वदीपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:11 IST2020-12-06T04:11:00+5:302020-12-06T04:11:00+5:30

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे कटऑफ गुणही नव्वदीपार गेले आहेत. सर्वाधिक कटऑफ असलेल्या पहिल्या महाविद्यालयाचे कला शाखेचे ...

In the second round too, the cut-off was ninety | दुसऱ्या फेरीतही ‘कट-ऑफ’ नव्वदीपर

दुसऱ्या फेरीतही ‘कट-ऑफ’ नव्वदीपर

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे कटऑफ गुणही नव्वदीपार गेले आहेत. सर्वाधिक कटऑफ असलेल्या पहिल्या महाविद्यालयाचे कला शाखेचे कटऑफ ९६.२० टक्के तर विज्ञान शाखेचे कटऑफ ९६.४० टक्के आहे. वाणिज्य शाखेचा सर्वाधिक कटऑफ ९३.४० टक्के आहे.

यंदा दहावीचा निकाल उंचावला असून विद्यार्थ्यांनाही भरभरून गुण मिळाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे कटऑफ तुलनेने वाढले आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीतही पहिल्या दहा महाविद्यालयांचे कटऑफ नव्वदीपार आहेत. तर वाणिज्य शाखेचे बहुतेक महाविद्यालयांचे कटऑफ ८५ ते ९० टक्क्यांच्या पुढे आहे. या यादीत कला शाखेचा सर्वाधिक ९६.२० टक्क्यांचा कटऑफ सिम्बायोसिस महाविद्यालयाचा आहे. वाणिज्य शाखेसाठीही या महाविद्यालयाला अधिक पसंती असून ९३.४० टक्क्यांचा कटऑफ लागला आहे. तर विज्ञान शाखेचा ९६.४० टक्क्यांचा कटऑफ फर्ग्युसन महाविद्यालयाचा आहे.

-----------------

काही महाविद्यालयांचे शाखानिहाय कटऑफ

कला

सिम्बायोसिस महाविद्यालय - ९६.२०

डॉ. कलमाडी महाविद्यालय - ९३.४०

स. प. महाविद्यालय - ८३

------------------

वाणिज्य

सिम्बायोसिस महाविद्यालय - ९३.४०

स. प. महाविद्यालय - ९२.४०

डॉ. कलमाडी महाविद्यालय - ८८.४०

-------------------

विज्ञान

फर्ग्युसन महाविद्यालय - ९६.४०

डॉ. कलमाडी महाविद्यालय - ९४

गरवारे महाविद्यालय - ९३.८०

स. प. महाविद्यालय - ९३.२०

-------------------------

Web Title: In the second round too, the cut-off was ninety