अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी आज
By Admin | Updated: July 5, 2016 03:22 IST2016-07-05T03:22:25+5:302016-07-05T03:22:25+5:30
अकरावी प्रवेशप्रक्रियेतील दुसऱ्या प्रवेश फेरीसाठीची गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ३६ हजार ७५२ जागा

अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी आज
पुणे : अकरावी प्रवेशप्रक्रियेतील दुसऱ्या प्रवेश फेरीसाठीची गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ३६ हजार ७५२ जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीतून ३६ हजार ६३३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमधील एकूण ७३ हजार ३८५ जागा उपलब्ध आहेत.
आॅनलाइन अर्ज भरलेल्या ५२ हजार ६१६ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतून प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले. त्यापैकी ३६ हजार ६३३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या फेरीत पात्र ठरलेले मात्र प्रवेश न घेतलेले विद्यार्थी या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. आता बेटरमेंटची संधी व पहिल्या फेरीत पात्र न ठरलेल्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या फेरीसाठी विचार केला
जाणार आहे. पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसह पालकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा लागून
राहिली आहे.
पहिल्या फेरीतील प्रवेशानंतर प्रवेशाच्या ३६ हजार ७५२ जागा रिक्त राहिल्या आहेत. या फेरीसाठी उर्वरित सुमारे २० हजार विद्यार्थी पात्र ठरतील. ही गुणवत्ता यादी प्रवेश समितीमार्फत मंगळवारी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. या फेरीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही सुरुवातीला ५० रुपये भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी तिसरी फेरी घेतली जाईल.
आॅनलाइन प्रक्रियेत नोंदणी न केलेले, गुणवत्ता यादीत नाव असूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विचार ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच
केला जाणार आहे. एटीकेटी मिळालेले तसेच फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही या वेळी विचार केला जाईल. त्यांना कशा पद्धतीने प्रवेश द्यायचे, याबाबत अद्याप समितीकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा
शाखामाध्यमप्रवेश दुसऱ्या फेरीसाठी
क्षमतारिक्त जागा
कलामराठी७९४०४९८७
कलाइंग्रजी३३८०२०९५
वाणिज्यमराठी१२३४०६२७२
वाणिज्य इंग्रजी१८४५५८९४३
विज्ञानइंग्रजी३१२७०१४४५५