शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant: पुण्यात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 20:08 IST

महिला दुबईहून पुण्यात दाखल झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे

पुणे : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आता महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर मुंबईत १०, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे शहरात २, डोंबिवलीमध्ये १, नागपूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ असे रुग्ण आढळून आले होते. तर आज पुणे शहरात ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर आता प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. 

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, पुण्यामध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. पुण्यातील ३९ वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली असून, ही महिला दुबईहून पुण्यात दाखल झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. महिलेला सध्या कोणतीही लक्षणे नसून, तिचे लसीकरण पूर्ण झाले आहे. महिलेला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

ओमायक्रॉनबाधित महिलेच्या संपर्कातील तीन जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पुण्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या आता २ झाली आहे. पुण्यातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दोन दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला आहे. फिनलँड येथून आलेल्या ४७ वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉनची लागण झाली होती.  दहा दिवसांनी पुन्हा चाचणी केल्यानंतर रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे निदान झाले.

आतापर्यंत राज्यात २० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. यापैैकी मुंबईत १०, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे शहरात २, डोंबिवलीमध्ये १, नागपूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ अशा रुग्णांचा समावेश आहे. यापैैकी ९ जणांना आरटीपीसीआर चाचणी करुन  घरी सोडण्यात आले आहेत.पुणे, मुंबई आणि नागपूर विमानतळावर १ डिसेंबरपासून आजपर्यंत अतिजोखमीच्या देशांतून १२,९९६ प्रवासी, तर इतर देशांतून ७१,०८२ असे एकूण ८५ हजार ७८ प्रवासी दाखल झाले. त्यापैैकी १४ हजार ७७७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. जनुकीय तपासणीसाठी अतिजोखमीच्या देशातील २४ तर इतर देशांमधील ८ अशा ३२ रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या