शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईची दुसरी सोडत १३ मेनंतर, पालक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:42 IST

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे; मात्र पुणे जिल्ह्यातील दुसºया फेरीची लॉटरी पद्धतीने सोडत १३ मेनंतरच निघू शकेल. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुसºया फेरीच्या प्रवेशाची वाट पाहत असलेल्या पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुणे - राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे; मात्र पुणे जिल्ह्यातील दुसºया फेरीची लॉटरी पद्धतीने सोडत १३ मेनंतरच निघू शकेल. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुसºया फेरीच्या प्रवेशाची वाट पाहत असलेल्या पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक विघ्न येत आहेत. काही इंग्रजी शाळांनी प्रवेश देण्यास दिलेला नकार, न्यायालयाची प्रवेशाला स्थगिती या गोंधळामध्ये आरटीईची पहिली फेरी अद्यापही पूर्ण होऊ शकलेली नाही. पुणे जिल्ह्यातील पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेले ५६ शाळांमधील ६७४ विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. न्यायालयाने प्रवेशावरील स्थगिती उठविल्याने या विद्यार्थ्यांना येत्या ११ मेच्या आत प्रवेश देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचलनालयाकडून देण्यात आले आहेत.पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने दुसºया फेरीची सोडत काढता येत नाही. दुसºया फेरीच्या सोडत काढण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचलनालयाकडून शासनाकडे मार्गदर्शन मागण्यात आला होता. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया येत्या ११ मेपर्यंत पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर दुसºया फेरीची सोडत काढावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. या मुदतीत ज्या शाळा प्रवेश देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करावी, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.आरटीईच्या पहिल्या फेरीतील सोडतीसाठी शाळेपासून १ किलोमीटरच्या आत राहणाºया विद्यार्थ्यांनाच विचार करण्यात आला होता. दुसºया फेरीत शाळेपासून दोन किलोमीटर अंतराच्या आत राहणाºया विद्यार्थ्यांमधून प्रवेशाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी अर्ज केलेल्या बहुसंख्य पालकांचे याकडे लक्ष लागले आहे.प्रवेशाची प्रक्रियापूर्ण करावी लागणारआरटीई प्रवेशासाठी सरकारकडून मिळणारी शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम मिळाली नसल्याचे कारण देत, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन (इसा) संघटनेच्या माध्यमातून राज्यातील २६३ शाळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर शासनाकडून प्रतिपूर्ती शुल्काची रक्कम शाळांना अदा करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश न दिलेल्या शाळांना आता प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेEducation Sectorशिक्षण क्षेत्र