शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Ramdas Athawale: भाजपचे नेते संविधान बदलाची भाषा बोलले म्हणून जागांचा फटका बसला - रामदास आठवले

By प्रशांत बिडवे | Updated: July 11, 2024 18:53 IST

पंतप्रधान नरेंद्र माेदी अथवा इतर कुणीही भारताचे संविधान बदलू शकत नाही, आठवलेंनी स्पष्टपणे सांगितले

पुणे : लाेकसभा निवडणुकीदरम्यान भाजप पुन्हा सत्तेत आला तर संविधान बदलणार या चर्चेला उधाण आले हाेते. याचवेळी भाजपचे काही नेतेही संविधान बदलाची भाषा बाेलले त्यामुळे जागांचा फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र माेदी अथवा इतर कुणीही भारताचे संविधान बदलू शकत नाही असे आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. 

एस.पी काॅलेज येथील लेडी रमाबाई हाॅलमध्ये आयाेजित विद्यार्थी संवाद परिषदेत मंत्री रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण अन मनाेरंजक शैलीत उत्तरे दिली. सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यासह रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस.के.जैन यांना ‘भिमाई भूषण जीवन गाैरव पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी आमदार अॅड. एल. टी. सावंत, शि.प्र. मंडळी परिषद सदस्य केशव वझे, श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष डाॅ. सतिश केदारी, संघमित्रा गायकवाड, प्राचार्य सुनिल गायकवाड आदी उपस्थित हाेते.

देशातील हिंदू-मुस्लिम वाद कमी व्हावा तसेच वाढत्या लाेकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी समान नागरी कायद्याची गरज आहे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. तसेच सरकारी क्षेत्राचे खासगीकरण करू नये आणि केलेच तर तेथेही सर्व घटकांना नाेकरीसाठी आरक्षण लागू करावे यांसह जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर रिपाइंला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता

मणिपूर आणि नागालॅण्डमध्ये रिपाईंचे प्रत्येकी दाेन आमदार निवडून आले आहेत. मणिपूर राज्यात रिपाइंला सतरा टक्के मते मिळाले आहेत. आणखी दाेन राज्यात सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली तर पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणBJPभाजपाlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी