शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाचा फळभाज्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:55 IST

दरामध्ये वाढ : ढोबळी मिरची, फ्लॉवर, मटारचे दर वाढले ;मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारात

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून, पावसामुळे शेतमालाची तोडणीच रखडली आहे. याचा परिणाम शेतमालाची आवक कमी होऊन, फळभाज्यांच्या दरामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारात दाखल होत असल्याने कांदा व हिरव्या मिरचीच्या भावात घट झाली आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये रविवारी (दि.२६) सुमारे १५० ते १६० ट्रक शेतमालाची आवक झाली. यामध्ये परराज्यासह जिल्ह्यातील शेतीमालाचा समावेश आहे. परराज्यातून प्रामुख्याने कर्नाटक, गुजरात येथून ५ ते ६ ट्रक कोबी, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून २० ते २२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून २ ते ३ टेम्पो शेवगा, इंदूर येथून ५ ते ६ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाच्या साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले दोन हजार पोती, टॉमेटोे चार ते साडेचार हजार पेटी, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, भेंडी १० ते १२ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, मटार २०० ते २५० गोणी, काकडी ८ ते १० टेम्पो, कारली ७ ते ८ टेम्पो, पावटा ३ ते ४ टेम्पो, भुईमूग १०० ते १२५ पोती, कांद्याची १०० ट्रक, आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून बटाट्याची ६० ट्रक इतकी आवक झालीपालेभाज्यांचे दर स्थिरपावसामुळे पालेभाज्यांचा दर्जा काही प्रमाणात खालावला आहे. परंतु श्रावण महिन्यामुळे पालेभाज्यांना मागणी कायम असून, पुरवठादेखील चांगला आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. रविवारी येथील तरकारी विभागात कोथिंबिरीची दीड लाख तर मेथीची ६० हजार जुडींची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला किरकोळ बाजारात दर्जानुसार १० ते १५ रुपये जुडी, तर मेथीची १० ते २० रुपये भावाने जुडीची विक्री होत आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीCrop Loanपीक कर्ज