चोरीला गेलेले दागिन्यांचा तासात लावला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:16+5:302021-07-15T04:09:16+5:30

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री विजय जगदाळे (वय ३५, व्यवसाय गृहिणी, रा. सगुणा मातानगर, फलटण, ता. ...

Search for stolen jewelry in an hour | चोरीला गेलेले दागिन्यांचा तासात लावला शोध

चोरीला गेलेले दागिन्यांचा तासात लावला शोध

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री विजय जगदाळे (वय ३५, व्यवसाय गृहिणी, रा. सगुणा मातानगर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) असे या विवाहितेचे नाव आहे. बुधवारी (दि. १४) शहरातील गुणवडी चौकात ही विवाहिता एका बेकरीत गेली होती. या वेळी टेम्पो (क्रमांक एमएच ११ एजी ६५६८) मध्ये ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबवली. यामध्ये बॅगेत असणारे २५ हजार रुपये किमतीच्या अर्धा तोळा वजनाची सोन्याची कानातील कर्णफुले, १३ हजार रुपये किमतीची २.७५ ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या रिंगांसह एक हजार रुपये रोख चोरीला गेले.

त्यानंतर घाबरलेल्या महिलेने शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहेरी आलेल्या महिलेची अवस्था ओळखून तातडीने सूत्रे हलवली. पोलीस यंत्रणेला आदेश दिले. महिला खरेदीसाठी गेलेल्या बेकरीचे सीसीटीव्ही पोलिसांनी मिळवत विवाहितेला दाखविण्यात आले. या वेळी सीसीटीव्हीतील महिलेच्या चेहऱ्यावरून पोलिसांनी रेकॉर्डवरील महिलेचे छायाचित्र शोधले. विवाहितेला दाखवल्यानंतर तिने देखील बॅग चोरताना या महिलेला ओळखले. त्यानंतर पोलीस अवघ्या एका तासात त्या महिलेपर्यंत पोहोचले. शहर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत विवाहितेचे दागिने, रोख रक्कम परत मिळवली. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे या तत्परतेबद्दल कौतुक होत आहे.

————————————————

फोटो ओळी : बारामती शहरात शहर पोलिसांनी अवघ्या एका तासात विवाहितेचे चोरीला गेलेले दागिन्यांसह रोख रक्कम परत मिळवली. या वेळी दागिने चोरी करणाऱ्या महिलेसह पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे आणि अन्य.

१४०७२०२१-बारामती-१५

————————————————

Web Title: Search for stolen jewelry in an hour