शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री करणारे दुकान सील ; इंदापूर तालुक्यातील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 22:03 IST

शेतकर्‍यांची फसवणूक आणि अडवणूक करणाऱ्या संबंधित दुकानदारांची लायसन्स रद्द करून कडक कारवाई करणार

बाभूळगाव:निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील शेतकरी व ग्राहकांची अडवणूक व फसवणुक करणार्‍या संबंधित खत दुकानावर इंदापूर तालुका कृृषि अधिकारी भाऊ रावसाहेब रूपनवर यांनी छापा टाकला. दुकानातील सर्व मालासह संबधित दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच दुकानाचे लायसन्स रद्द करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती देखील कृृृषि अधिकाऱ्यांनी दिली.

गजकुमार हिराचंद गांधी कृृृषि भंडार असे कारवाई करण्यात आलेल्या खत दुकानाचे नाव आहे.तर प्रविण एकनाथराव बारवकर (रा.काटी, ता.इंदापूर,जि.पुणे) यांनी संबंधित दुकानदार यांच्याविरूद्ध इंदापूर तहसिलदार व तालुका कृृृृषि अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बुधवारी (दि.३०) या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी दुकानात अतिरिक्त खत साठा आढळुन आला. यामध्ये युरीया खताच्या ९९२ बॅगा किंमत २ लाख ६३ हजार, अमोनियम सल्फेट खत १७४ बंग, किंमत १ लाख ४ हजार, १०:२६:२६ ४५५ बॅग, ५लाख ४६ हजार, २०:२०:०:१३ ९८०बॅग, २ लाख ३५ हजार, एस.एस.पी. ३८० बॅग, ५७ हजार असे सर्व मिळुन १२ लाख ५ हजार रूपयाच्या मुद्देमालासह हे दुकान २१ दिवसांसाठी सील करण्यात आल्याची माहिती तालुका कृृषि अधिकाऱ्यांनी दिली आहे.————————————————————————...तर दुकानदाराचे लायसन्स रद्द करणारइंदापूर तालुक्यातील अनेक खत दुकानदार हे रासायनिक खतांचा गोडावुनमध्ये छुप्या पद्धतीने अतिरिक्त साठा करून हंगामाच्या काळात सदरची खते चढ्या दराने विक्री करत व गोरगरीब शेतकर्‍यांची फसवणूक आणि अडवणूक करून जादा पैसे घेत आहेत. सबंधित दुकानांबाबत तक्रारी दाखल झाल्यास दुकानदारांची लायसन्स रद्द करून कडक कारवाई करणार असल्याची माहिती इंदापूर तालुका कृृृृषि अधिकारी भाऊ साहेबराव रूपनवर यांनी दिली.

टॅग्स :IndapurइंदापूरFarmerशेतकरीagricultureशेती