नारायणगावत सात दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:11 IST2021-04-13T04:11:16+5:302021-04-13T04:11:16+5:30

शासनाच्या आदेशाची अंबलबजावणी व्यापारी वर्गाने करून स्वयंस्फूर्ती दुकाने बंद ठेवल्याने कोणतीही कारवाई दोन दिवसांत केलेली नाही, मात्र गेल्या ...

Seal seven shops in Narayangaon | नारायणगावत सात दुकाने सील

नारायणगावत सात दुकाने सील

शासनाच्या आदेशाची अंबलबजावणी व्यापारी वर्गाने करून स्वयंस्फूर्ती दुकाने बंद ठेवल्याने कोणतीही कारवाई दोन दिवसांत केलेली नाही, मात्र गेल्या आठवड्यात तीन दुकानदारांनी शासनाच्या आदेशाचा भंग केल्याने ती तीन दुकाने सात दिवसासाठी सील करण्यात आली आहे , ग्राहकांना हॉटेल मध्ये बसवुन सोशल डिस्टन्सचे पालन न करता आणि ५ पेक्षा जास्त लोकांची एका ठिकाणी गर्दी करून खाद्य पदार्थांची विक्री करताना पाच हॉटेल मिळून आले. यापैकी महालक्ष्मी पान स्टॉल , कामीद किराणा स्टोअर , आणि मयूर रसवंत गृह या व्यावसायिकांचे आस्थापना सील करणे बाबत प्रस्ताव तहसीलदार यांचेकडे पाठविले होते त्यानुसार ही दुकाने सात दिवसासाठी सील करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

Web Title: Seal seven shops in Narayangaon