शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मतांशी सहमत नसल्यास धर्मांधाचा शिक्का लागतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 12:21 IST

केवळ आम्हीच उदारमतवादी बाकीचे प्रतिगामी असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे.

ठळक मुद्देडेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन

पुणे : सभ्य किंवा सुसंस्कृत समाजामधील सर्व लोक हे उदारमतवादी आणि धोती-कुर्ता वेश परिधान केला तर आम्ही असभ्य आणि प्रतिगामी अशी मिश्कील टिप्पणी करीत, आपल्या मताशी समोरचा सहमत नसेल तर त्याच्यावर विशिष्ट विचारांचा शिक्का मारला जातो. आम्हीच तेवढे उदारमतवादी असे लोकांना वाटते. बाकीच्यांना जातीय, धर्मांध ठरवले जात असल्याची टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.दखनी अदाब फाउंडेशनतर्फे ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सत्यपाल सिंह, प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज, साखर आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनोज ठाकूर उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.सभ्य समाजात उदारमतवादी म्हणवून घेणाऱ्या मंडळींना कोश्यारी यांनी चांगलेच लक्ष्य केले. केवळ आम्हीच उदारमतवादी बाकीचे प्रतिगामी असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे. लोक स्वत:च स्वत:ला उदारमतवादी म्हणून जाहीर करतात. समोरची व्यक्ती आपल्या विचारांशी मिळती-जुळती नाही, म्हणून ती प्रगतिशील वाटत नाही. त्या व्यक्तीची प्रगती कशी होईल, हा विचार करायचा सोडून तिच्यावर जातीय, धर्मांध, पुराणमतवादी असे शिक्के मारले जातात. किमान साहित्यिक आणि कलाकारांनी तरी हे उद्योग करू नयेत, असा सल्लाही कोश्यारी यांनी दिला.साहित्य हा समाजाचा आरसा असतो. मात्र, लेखणी आणि चित्रपटाचा परिणामदेखील समाजमनावर होत असतो. त्यामुळे या दोन्हींमध्ये खूप मोठी ताकद आहे. एखादा निर्माता आणि साहित्यिक या ताकदीचा उपयोग कसा करतात, हा प्रश्न आहे. देश एकसंध राहण्यासाठी आणि देशाबद्दल अभिमान जागृत ठेवण्यासाठी साहित्यिक आणि कलाकार नक्कीच योगदान देऊ शकतात. त्यांच्या प्रयत्नातून नवनीत समोर येऊ शकेल आणि समाजाला नवी दिशा मिळू शकेल, असा विश्वासही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.............कलेला जातधर्म नसतो. त्यापलीकडे जाऊन साहित्य निर्माण व्हायला हवे. देशात स्वतंत्रता हवी असे आपण म्हणतो; पण इथे इतिहास विदेशी लोकांचा शिकवला जात आहे हे आपले दुर्दैव आहे.- सत्यपाल सिंह .............

प्रत्येक शहर, गल्लीत साहित्य महोत्सव भरवले जात आहेत, अशी टीका केली जाते. फॅशन म्हणून लोक येतात अस म्हटलं जातं; पण दोन लोकांची मने जरी बदलली तरी पुष्कळ आहे. ज्या देशाची कला समृद्ध असते तिथली अर्थव्यवस्था सुदृढ राहते.- विशाल भारद्वाज ............

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी