वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारे एक शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस. त्यांनी हा शोध लावला. हे उपकरण त्यांनी रोपट्याला जोडले. त्याच्या सूक्ष्म स्पंदनांना वर्धित स्वरूपात पडद्यावर दाखवणे हा प्रयोग त्यांनी केला आणि वनस्पतींना संवेदना असते हे जगाला दाखवून दिले.
सर जगदीशचंद्र बोस ३० नोव्हेंबर १८५८ रोजी पूर्व बांगलामधील ढाक्का जिल्ह्यातील राणीखल येथे जन्मले. बालपणी त्यांच्यावर रामायण आणि महाभारत या श्रेष्ठ महाकाव्यांचे संस्कार झाले. मित्रांनो, सातत्याने कठोर परिश्रम केल्यास अपयशाचे परिवर्तन यशामध्ये होऊ शकते यावर त्यांची श्रद्धा होती. इ. स.१८९५ मध्ये प्रा. बोस यांनी रेडिओतरंग पक्क्या भिंतीतून परिवर्तित कार्य येऊ शकतात हे प्रयोगाद्वारे दाखवले.
वनस्पतीशरीर क्रियाशास्त्र या विषयावर त्यांनी संशोधन केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात. मनाप्रमाणे सुखदुःखाच्या प्रतिक्रिया आवाजाच्या माध्यमातून जरी त्या व्यक्त करू शकल्या नाहीत तरी फुलून किंवा कोमेजून किंवा वाळून त्या आपल्या भावना व्यक्त करतात. अन्य सजीवांप्रमाणे वनस्पतीही श्वासोच्छ्वास करतात हे पाहून जगभरातील शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले.
‘मृत्यूनंतर माझी उरलीसुरली संपत्ती विकून त्यातून मिळणारे धन सामाजिक कार्यासाठी वापरावेच’ असे विधान त्यांनी मृत्यूच्या एक दिवस आधी केले होते. कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर, भारतीय थोर वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांचे समकालीन वैज्ञानिक सर जगदीशचंद्र बोस यांचे निधन २३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाले.
- प्राजक्ता प्रशांत मुरमट्टी