संस्कारांमागे होती वैज्ञानिक कारणो
By Admin | Updated: August 5, 2014 23:48 IST2014-08-05T23:48:33+5:302014-08-05T23:48:33+5:30
संस्कार म्हणजे मानवी दृष्टिकोनाचा विचार आहे. भारताला संस्कारांची मोठी परंपरा लाभली असून, जुन्या काळातल्या संस्कारांना ठोस वैज्ञानिक कारणो होती,

संस्कारांमागे होती वैज्ञानिक कारणो
पुणो : संस्कार म्हणजे मानवी दृष्टिकोनाचा विचार आहे. भारताला संस्कारांची मोठी परंपरा लाभली असून, जुन्या काळातल्या संस्कारांना ठोस वैज्ञानिक कारणो होती, असे उद्गार राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांनी काढले.
विश्वशांती केंद्र, माईर्स एमआयटीतर्फे ‘9वी ते 11वी विद्याथ्र्यासाठी मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्त्व विकास’ प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्याथ्र्याना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर अध्यक्षस्थानी होते. शिक्षण संचालक (प्राथमिक) महावीर माने, सहसंचालक (माध्यमिक) दिनकर पाटील एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये व दिलीप फलटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बोंगीरवार म्हणाले, भारतीय संस्कारांना वैज्ञानिक कारणो असल्यामुळे प्रत्येक बाबतीत सकारात्मकतेचा विचार दिसून येतो. मंदिरांची उभारणी करतानादेखील पृथ्वीच्या उदरातून येणा:या सकारात्मक लहरींचा विचार केला जातो. आत्मविश्वासाच्या जोरावर नेतृत्व निर्माण झाले, तरच स्पर्धेच्या काळात टिकून राहणो शक्य होणार आहे.
भटकर म्हणाले, चांगलं शिक्षण आणि चांगलं प्रशासन या दोन गोष्टी आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चांगलं शिक्षण म्हणजे मूल्यांवर आधारित शिक्षण. हे मूल्याधारित शिक्षण आपल्याकडे हजारो वर्षापासून दिले जात आहे. सत्य, अ¨हंसा, अचौर्य या मूल्यांचा अंतर्भाव असलेली संस्कृती भारतात आजही टिकून आहे. महावीर माने म्हणाले, राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून दहावीर्पयतच्या अभ्यासक्रमात मूल्यशिक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
दिनकर पाटील म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात निर्माण झालेला पहिला शिक्षणविषयक आयोग हा मूल्यशिक्षणावर आधारितच होता. या मूल्यशिक्षणाद्वारे आपल्या समाजाचा पाया पक्का झाला, तर भविष्यात येणा:या समस्यांचा आपण सहज सामना करू शकतो.
कराड म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृती ही कोणत्याही एका धर्मावर नव्हे, तर मानवी मूल्यांवर आधारित आहे. विद्याथ्र्यानी कोणत्याही क्षेत्रत करिअर घडविले, तरी माणूस म्हणून यशस्वी होण्यासाठी त्यांना मूल्यशिक्षणाचा उपयोग होणार आहे.’’ डॉ. एस. एन. पठाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप फलटणकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पारितोषिक विजेते
संवेद जोशी, स्वामी विवेकानंद सुवर्ण अॅकॅडमी (औरंगाबाद), शिवकन्या कराड सरस्वती माध्यमिक रामेश्वर (लातूर), प्राजक्ता मुस्कवाड पद्मावती विद्यालय(लातूर), नम्रता ¨शंदे सरस्वती माध्यमिक (लातूर), शुभम बोर्डे, दादाराव कराड माध्यमिक विद्यालय (लातूर), विशाखा नाईक, श्री सरस्वती न्यू प्रथम सुवर्ण इंग्लिश स्कूल (पुणो), अजित नागरगोज (बार्शी), पीयूष ¨शदेश्री (पुणो), अंजली मांगले (पुणो)