शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात
By Admin | Updated: December 28, 2015 01:32 IST2015-12-28T01:32:05+5:302015-12-28T01:32:05+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत तळेगाव ढमढेरे केंद्र क्र.२ येथे शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्याची माहिती केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर यांनी दिली

शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात
तळेगाव ढमढेरे : जिल्हा परिषद अंतर्गत तळेगाव ढमढेरे केंद्र क्र.२ येथे शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्याची माहिती केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.२ केंद्राच्या धावणे, उंचउडी, लांब उडी, गोळा फेक, वक्तृत्व स्पर्धा, कबड्डी, खो-खो, लंगडी, लेझीम, लोकनृत्य, भजन व चेंडू फेक स्पर्धा पार पडल्या. या वेळी घोडगंगा कारखान्याचे संचालक पोपट भुजबळ, माजी सरपंच विश्वास ढमढेरे, उपसरपंच राकेश भुजबळ, विस्तार अधिकारी वंदना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा प्रकार, विद्यार्थी, शाळा, प्रथम क्रमांक पुढीलप्रमाणे :
धावणे : ओंकार रवींद्र भोसुरे (धानोरे), यशस्वी विजय जाधव (विठ्ठलवाडी). चेंडू फेक : अभिषेक पवार (विठ्ठलवाडी), श्वेता गवारी (विठ्ठलवाडी). वक्तृत्व : विराज लोखंडे (टाकळी भीमा).
वरील सर्व पहिली ते चौथी गटात प्रथम, तर खालील पाचवी ते सातवी गटात प्रथम आलेले : धावणे (१०० मी) : अजय पवार (टाकळी भीमा), ज्ञानेश्वरी ढोकरे (धानोरे). उंच उडी : धीरज दरेकर व दिशा जगताप (धानोरे).
लांब उडी : प्रथमेश ढवळे (टाकळी भीमा), ज्ञानेश्वरी ढोकरे (धानोरे).
गोळाफेक : धनंजय भोसुरे, अलिशा शेख (धानोरे). वक्तृत्व : कोमल गायकवाड (धानोरे), कबड्डी - टाकळी भीमा, धानोरे, खो-खो - धानोरे - मुले, मुली, लंगडी-धानोरे मुले-मुली. (वार्ताहर)