शाळा क्रमांक १ आणि ८ भरणार नवीन जागेत

By Admin | Updated: June 13, 2015 04:29 IST2015-06-13T04:29:38+5:302015-06-13T04:29:38+5:30

जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या बारामती नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक १ आणि ८ च्या दुरवस्थेकडे पालिकेचे लक्ष गेले आहे

School No. 1 and 8 will fill in new space | शाळा क्रमांक १ आणि ८ भरणार नवीन जागेत

शाळा क्रमांक १ आणि ८ भरणार नवीन जागेत

बारामती : जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या बारामती नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक १ आणि ८ च्या दुरवस्थेकडे पालिकेचे लक्ष गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीतच गोरगरीब कुटुंबातील मुले या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. यावर्षीची शाळा सुरू होण्यास काही दिवसच उरलेले असतानाच दोन्ही शाळा पर्यायी ठिकाणी भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या शाळा इमारतींच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल नगरपालिका प्रशासनाने घेऊन या दोन्ही शाळांचे प्रश्न मार्गी लावण्याचा ठराव करण्यात आला आहे. शाळा क्रमांक ८ ही शाळा दि कॉन्फरन्स आॅफ चर्चेस आॅफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या जागेवर आहे. १० ते १२ वर्षांपासून शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. या संस्थेने शाळा बांधून इमारत त्यांच्याकडे हस्तांतरित करावी, असा प्रस्ताव दिला आहे. यावर्षी शाळा त्याच इमारतीत भरवणे धोकादायक असल्याचे पत्र शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याचबरोबर शाळा क्रमांक १ ची जागा मूळ मालकाने परत मागितली आहे. १९९६ पासून त्यांनी नगरपालिकेकडून भाडेदेखील घेतलेले नाही. त्यामुळे या शाळेची इमारत गळते. विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्या ठिकाणी सोयीसुविधा करता येत नाही, असा प्रस्ताव दिला आहे. तात्पुरत्या स्वरूपात शाळा क्रमांक १ दुर्गा सिनेमागृहासमोरील श्री बाबासाहेब देशमुख समाज मंदिरामध्ये हस्तांतरित करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर शाळा क्रमांक ८ ची भूसंपादन प्रक्रियेबाबत संबंधित संस्थेच्या ट्रस्टींबरोबर चर्चा सुरू आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: School No. 1 and 8 will fill in new space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.